Amalner

गायत्री शक्तीपीठ, चोपडा रोड, अमळनेर येथे सालाबाद प्रमाणे लक्ष्मीपूजन निमित्ताने दीपोत्सव साजरा

गायत्री शक्तीपीठ, चोपडा रोड, अमळनेर येथे सालाबाद प्रमाणे लक्ष्मीपूजन निमित्ताने दीपोत्सव साजरा

प्रवीण बैसाणे

पैलाड भागातील चोपडा रोड येथील गायत्री मंदिरावर दर वर्षी दिवाळी सणाच्या निमित्ताने माँ गायत्री विद्यार्थी मित्र परिवारा तर्फे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिप उत्सव साजरा करण्यात येतो.
या दीपोत्सवाचे वैशिष्ठ म्हणजे या उत्सवात मंदिरावरील जे विद्यार्थी अभ्यास करून प्रशासकीय सेवेत जनतेची सेवा करीत आहेत. तसेच बरेच विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय व खाजगी नोकरी करून समाजकार्य देखील करत आहेत.
असे सर्व माँ गायत्री विद्यार्थी मित्र परिवारातील सर्व विद्यार्थी एकत्र येऊन लक्ष्मीपूजनाच्या सणाला माँ गायत्री मंदिरावर मोठ्या जल्लोषात दीपोत्सव साजरा करतात व समाजाला एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करतात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button