सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्राला पुस्तकांसाठी दिले विस हजार रुपये.
स्पर्धा परीक्षा संचालक विजयसिंह पवार यांनी मानले आभार.
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- कोणतेही चांगले काम असो माजी आमदार साहेबराव पाटील त्यासाठी कोणत्याही प्रकारचा किंतूपरंतू न ठेवता सढळ हाताने मदत करणे हा त्याचा छंद आहे. पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचणाऱ्याला भेट दिली असता त्यांनी समाधान व्यक्त केले. व त्याठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम त्यांना खूपच आवडला.
माजी आमदार दादासो.श्री साहेबराव धोंडू पाटील यांच्या तर्फे पूज्य सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला पुस्तके घेण्यासाठी वीस हजार (20000)रुपयांची रोख मदत मिळाली. गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही मदत खूप प्रेरणादायी ठरेल. दादांनी जी मदत दिली त्याबद्दल पूज्य सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा परिवारातील सर्व अधिकारी, मार्गदर्शक व विद्यार्थ्यांतर्फे दादांचे विशेष आभार.तसेच यावेळी दादांनी मुलींसाठी स्वतंत्र स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू करण्यासाठी पंचवीस लाख रुपयांची खास तरतूद करून अमळनेर शहरात लवकरच अभ्यासिका सुरू करण्यात येईल असे जाहीर केले। यावेळी अमळनेरचे पीआय मा.श्री अंबादास मोरे,मा.भैय्यासाहेब विनोद पाटील,इंजि.मा.मनोज बापू,मा.श्री जयवंतराव पाटील,मा.श्री विक्रांत पाटील,मा.श्री विजुभाऊ लांबोळे ,मा.श्री राजू परदेशी,जनवास्तवचे संपादक मा.श्री किरण पाटील,मा.बोरसे आबा,पीएसआय श्री संदीप भोई,पोलीस श्री चंदन पाटील व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।
माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्राला वीस हजार रुपये मदत दिल्याबद्दल स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक
विजयसिंग पवार यांनी त्यांचे आभार मानले.






