sawada

सावदा येथील डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल & जूनियर कॉलेजचा १० वीचा निकाल १०० टक्के

सावदा येथील डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल & जूनियर कॉलेजचा १० वीचा निकाल १०० टक्के

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- रावेर तालुक्यातील सावदा येथे असलेल्या डायमंड इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा यंदा १० विचा निकाल १०० टक्के लागला आहे. मार्च २०२३ मध्ये झालेल्या इयत्ता १० वी चा माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल शुक्रवार दुपारी १वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहिर झाला असून त्यानुसार डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल & जूनियर कॉलेज सावदाचे जाहीर झालेल्या निकालात शेख फरहत जहॉं यांनी (८७.८० टक्के) गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला तर अलमीरा फातेमा यांनी(८३.२० टक्के)गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविले व जैनब नाज या विद्यार्थिनी (८०.८० टक्के)गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.या शाळेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल & जूनियर कॉलेज सावदाचे अध्यक्ष डॉ.हाजी हारून सेठ,प्रिन्सिपल शादाब अहमद सर,प्रिन्सिपल लक्ष्मी मॅडम,हाजी हारून सेठ फाउंडेशनचे अध्यक्ष नाजिम शेख सह शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button