जनआक्रोश आंदोलन छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य अमळनेर
ठिकाण = पंचायत समिती अमळनेर, तहसील कार्यालय अमळनेर,
तारीख=19 जुलै 2021
वेळ =11 वाजता
अमळनेर तालुक्यातील विविध ग्राम पंचायत मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला, त्याची संपूर्ण चौकशी, ग्रामसेवक निलंबित, सरपंच निलंबित, दोन ग्राम पंचायत विस्तार अधिकारी निलंबित, इतर एक माणूस वर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे…
पंचायत समिती सभापती व उपसभापती व इतर लोकाचा मनमानी पद्धतीने कारभार सुरू आहे…त्याची हुकुमशाही बंद झाली पाहिजे…
अमळनेर तालुका दुष्काळ जाहीर करावा…सर्व अमळनेर तालुक्यातील गावात ग्रामसेवक व तलाठी यांनी प्रामाणिक माणूस म्हणून काम करावे…जनतेला न्याय देणे त्याचं काम आहे…सर्व शासकीय योजना सामान्य माणसाला मिळाल्या पाहिजेत असं काम अमळनेर तालुका मध्ये झाले पाहिजे…
चिचोले, राणे, ठाकूर व पाटील यांची सी. बी.आय. किंवा ईडी कडून त्याची मालमत्ता संपत्ती बँक खाते ची कायदेशीर चौकशी झाली पाहिजे…
अमळनेर पंचायत समिती मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार व मनमानी पद्धतीने कारभार व हुकुमशाही करणारे राजकीय नेते व यांचा सर्व प्रकार चा विषय संपला पाहिजे…तर जनतेला न्याय भेटणार आहे, नाही तर जनतेला वेठीस धरून अधिकारी व कर्मचारी व नेते यांना दफ्तर दिरंगाई कायदा नुसार हायकोर्ट मधे रिट दाखल करून जनतेला न्याय मिळवून देऊ…
अमळनेर जनआक्रोश आदोलन मध्ये छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य चे महासचिव व कायदेशीर सल्लागार adv. अलका मोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन करण्यात आले होते.या प्रसंगी जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा.जगदाळे सर, जळगांव जिल्हा अध्यक्ष हिरामण पाटील, नाशिक जिल्हाध्यक्ष वैभव गवाल, नाशिक शहराध्यक्ष शांतीलाल निकम, नाशिक महिला जिल्हाध्यक्ष ललिताताई माळी पवार, नाशिक ग्रामीण संपर्क प्रमुख सुशील अहिरे, माजी सरपंच लोटन पाटील, माजी मुख्याध्यापक युवराज पाटील, चेअरमन वि.का. रोहिदास पाटील, ज्येष्ठ नेते सुरेश पूना वानखेडे, मुकेश पाटील, नटराज पाटील, प्रशांत पाटील, समाधान पाटील, गजानन पाटील, कैलास पाटील, सतीश अहिरे, चुडामन पवार, गुलाब पाटील, दिनेश पाटील व योगेश पाटील, बापूसाहेब पठारे छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य चे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते…..






