वंचित बहुजन आघाडि लोणंद तर्फे लोणंद शंभर टक्के बंद
दिलीप वाघमारे
लोणंद शहरातील वंचित बहुजन आघाडी च्या वतीने लोणंद बंद पाळण्यात आला शी ए ए एन आर सी पी एन आर या संविधान कायद्याच्या विरोधात कायदे व धोरणांच्या अंमलबजावणीला विरोध करण्यासाठी अँड प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला लोणंद च्या वतीने साथ देण्यासाठी लोणंद शहर बंद ठेवून शहरातून मोर्चा शांतते मध्ये बुद्ध विहार पासून मोर्चा सुरुवात होऊन एसटी स्टॅन्ड मार्गे अहिल्याबाई पुतळ्याकडे कडून शिवाजी चौक स्टेशन चौक तानाजी चौक गांधी चौक मार्गे नगरपंचायत च्या प्रांगणात सांगता समारोप संपन्न झाला.

यावेळी श्रीमती खरात नगरसेविका नंदकुमार खरात इक्बाल बागवान दत्ता शेठ खरात आदींची भाषणे सरकारवर कडाडून टीका केली मोर्चाचे नेतृत्व उमेश खरात राजाभाऊ खरात संतोष खरात दत्ता शेठ खरात सुरेंद्र खरात राजेंद्र खरात आदींनी केले मोर्चामध्ये बहुजन समाजातील सर्व कार्यकर्ते हे वंचित आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते हे बहुसंख्येने सामील झाले होते शहरामध्ये अनुचित प्रकार घडला नाही लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि संतोष चौधरी व त्यांचे सहकारी बंदोबस्त चोख ठेवला होता






