Ratnagiri

सौ.पिंगला पावरा यांचा पंचायत समिती दापोली कर्मचारी तर्फे सत्कार

सौ.पिंगला पावरा यांचा पंचायत समिती दापोली कर्मचारी तर्फे सत्कार

रत्नागिरी : महिला दिनानिमित्त सगळीकडेच महिलांच्या कामगिरीबद्धल व यशाबद्दल सत्कार होत असतांना दापोलीत शिक्षिका असलेल्या सौ.पिंगला सुशिलकुमार पावरा यांचा पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्प देऊन सत्कार केला. शासनमान्य नोंदणीकृत ऑल इंडिया आदिवासी एम्पलाईज फेडरेशन संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महिला संघटक पदी थेट निवड झाल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला. पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी पद्मन लहांगे , माजी भारतीय आर्मी तथा शिपाई सुनिल इदाते, मनोज तुरे इत्यादी कर्मचारी यांनी हा सत्कार केला. पिंगला पावरा ह्या जिल्हा परिषद दापोली नं.1 येथे शिक्षिका आहेत. शासनमान्य नोंदणीकृत आदिवासी अधिकारी व कर्मचारी सामाजिक संघटनेच्या जिल्हा सचिव म्हणून त्या कार्यरत होत्या. रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मनोहर पाडवी व जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य यांनी पिंगला पावरा यांची राज्य कार्यकारिणी साठी शिफारस केली होती. त्यानूसार मीट द्वारे ऑनलाईन सभेत झालेल्या दिनांक 7 मार्च 2021 रोजीच्या राज्यस्तरीय सभेत ही निवड ऑल इंडिया आदिवासी एम्पलाईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मधूकर उईके यांनी केली. विजय कोकोडे केन्द्रीय सरचिटणीस यांनी सौ.पिंगला पावरा यांची राज्य महिला संघटक पदी निवड झाल्याचे सभेत घोषीत केले. ऑल इंडिया आदिवासी एम्पलाईज फेडरेशन ही आदिवासी अधिकारी व कर्मचारी यांची संघटना असून सन 1967 मध्ये नोंदणीकृत असून नोंदणी क्रमांक 159/67 असा आहे.तसेच ट्रेड युनियन अॅक्ट 1926 नुसारही संघटनेची नोंदणी झाली असून संघटना शासनमान्य आहे. संघटनेचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतभर आहे. आदिवासींचे हक्क व अधिकार, पदोन्नती व तसेच आदिवासी अधिकारी व कर्मचारी यांच्या एकूणच सर्व आदिवासी समाजाच्या विषयांवर काम करणारी ही नोंदणीकृत संघटना असून न्यायिक लढा लढत असते. पिंगला पावरा यांची राज्य महिला संघटक पदी निवड झाल्याबद्दल ऑल इंडिया आदिवासी एम्पलाईज फेडरेशनच्या केंद्रीय,राज्य व जिल्हा व तालुका स्तरीय सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच सर्वच आदिवासी बांधवांनी अभिनंदन केले आहे.
पिंगला पावरा यांचे पती सुशीलकुमार पावरा हे सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असतात. त्यांच्या सामाजिक कार्यात पिंगला पावरा यांची नेहमी साथ असते.त्याचीच दखल घेत त्यांची थेट महाराष्ट्र राज्य महिला संघटक पदी निवड झाली आहे.याबद्दल पंचायत समिती दापोलीच्या कर्मचारी यांनीही पिंगला पावरा यांचे पुष्प देऊन अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button