भिमाशंकर परिसरातील पर्यटन बंदी मुळे ओसाड, आदिवासींचा रोजगार बुडाला
प्रतिनीधी – दिलीप आंबवणे
भीमाशंकर परिसरातील निसर्गरम्य वातावरणात अनेक ठिकाणी धबधबे वाहत आहेत त्यामध्ये कुशिरे धबधबा हा तळेघर पासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. तसेच माळीण पासून दहा किलोमीटर अंतरावर आहे सध्या पर्यटन बंदी जरी असली तरी हे धबधबे मात्र मोठ्या प्रमाणावर वाहू लागले आहेत.
दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी असते यावर्षी कोंढवळ धबधबा ,पाटण धबधबा, कुशिरे धबधबा, बोरघर धबधबा, आहुपे, हतवीज सह्याद्रीची राग याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते मात्र या लाँक डाऊन मुळे सध्या पर्यटकांना पर्यटन बंदी असल्यामुळे त्या भागात कोणी फिरता येत नाही.
त्यामुळे आदिवासी समाजाचा रोजगार बुडाला आहे तरी पर्यटकांनी घरीच थाबणे आवश्यक आहे.






