?️ अमळनेर कट्टा..प्रशासनाकडून तयारी पूर्ण,कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न..यंत्रणा झाली सज्ज..काही तासात होईल निकाल घोषित..
अमळनेर:- नगरपालिका इंदिराभुवन सभागृहात उद्या सकाळी १० वाजता मतमोजणी होईल.निवडणूक अधिकारी तहसीलदार मिलिंद वाघ यांनी नगरपालिकेच्या इंदिराभुवन सभागृहात मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून आज कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग पार पडला.यात 77 कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले.सकाळी 10.30 ते 1 वाजेपर्यंत प्रशिक्षण देण्यात आले.
तसेच १९ टेबलांवर मतमोजणी होणार असून एका टेबलावर पर्यवेक्षक, साहाय्य, शिपाई असे तीन कर्मचारी असतील एका वेळी ५ ते ६ गावांचे मत मोजले जाईल उद्या १८ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरवातीला होईल अवघ्या २० मिनिटात ५ गावांचा निकाल हाती येईल अशी माहिती तहसीलदार वाघ यांनी दिली आहे.
दरम्यान सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे.कारण निकालानंतर आरक्षण सोडत निघणार असून त्या नंतर खऱ्या अर्थाने राजकीय वातावरण तापणार आहे.
अमळनेर तालुक्यातील 67 पैकी 16 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 51 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी 77.77% मतदान झाले आहे. त्यात 68 हजार 271
मतदारांपैकी 53 हजार 94 मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.






