Paranda

परंडा पोलिसांच्या महारक्तदान शिबीराला प्रतिसाद २९१ रक्तदात्यांचे रक्तदान..

परंडा पोलिसांच्या महारक्तदान शिबीराला प्रतिसाद २९१ रक्तदात्यांचे रक्तदान..

सुरेश बागडे परंडा

परंडा : पोलिसांच्या वतीने दि ३० जुन रोजी पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे व सहाय्यक पोलिस निरिक्षक मोमीन यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस ठाण्यात रक्तदान शिबीर घेण्यात आले या शिबीरात तालूक्यातील .२९१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यांना पोलिसांच्या वतीने हलमेट भेट देण्यात आले .

कोरोना मुळे रक्ताचा तुटवडा भासत असल्याने परंडा पोलिस दल , पोलिस पाटील संघटना व ग्रामसुरक्षा दल यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .

बळीराजा शेतकरी संघटणेचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख , रमेश गणगे , उप संपर्क प्रमुख बालाजी बानगुडे यांच्या मार्गदर्शना खाली संघटणेचे च्या पदाधिकारी यांनी रक्तदान केले या वेळी औंदूबर ठोंगे , फुलचंद ओव्हाळ, ब्रम्हदेव मांजरे , राहुल कदम , किशोर लांडगे , गणेश भोरे , सुजित ढगे , आंगद लांडगे , महादेव जाधव , तानाजी बनसोडे उपस्थित होते .

या रक्तदान शिबीरास तालूक्यातुन उत्सफुर्त प्रदिसाद मिळाला असुन पांडूरंग कोकणे यांच्या क्रांतीसंगर करिअर अकॅडमी तील ११ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले तर
तर महाविर तनपुरे यांच्या कमांडो करिअर अकॅडमी च्या २७ विद्यार्थांनी रक्तदान केले .

तर डोंजा येथील गणेश भाग्यवंत व सुषमा भाग्यवंत या शिक्षक दाम्पत्यांनी रक्तदान केले .

पोलिसांच्या अहवानाला प्रतिसाद देत तालूक्यातील नागरीका सह पोना हावले , पोकॉ खराट , पोकॉ कवडे , पोकॉ शेख या पोलिस कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले .

रक्तदान शिबीर यशस्वीते साठी पोना हावळे , पोकॉ कवडे , पोकॉ शेख , महिला पोलिस नाईक मुल्ला , पोकॉ शिंदे , पोना शिंदे , होमगार्ड परंडकर, होमगार्ड शेख, यांनी शिबीर यशस्वी करण्या साठी परिश्रम घेतले .
रक्तदात्यांना हेलमेट व प्रमाणपत्राचे वाटप पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले .

रक्तदान शिबीरात रक्तदान करून सहकार्य केल्याने पोलिस निरिक्षक गिड्डे यांनी सर्वाचे अभार मानले .

रक्तसंकलन बार्शी येथील भगवंत रक्तपेढीचे कर्मचारी गणेश जगदाळे , अमोल नवले, विजय तोडकरी , प्रजक्ता क्षिरसागर , अकांशा कदम , शबाना शेख ,यांनी रक्त संकलन केले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button