श्री संताजी जगनाडे महाराज बहू.संस्था व गोजराई क्लिनिक तर्फे पोलिस, आरोग्य, न.पा.विभागात फेस प्रोटेक्टर वाटप
पारोळा प्रतिनिधी – कमलेश चौधरी
कोरोना (कोव्हीड-19) ने जगात थैमान घातले आहे. देशासह राज्यात आणि जिल्ह्यात देखील कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आणि कोरोना बाधीत रुग्णांवर आपल्या आरोग्याची परवा न करता उपचार करणारे डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी, शहराची शांतता आणि जनतेचे सरंक्षण करण्यासाठी जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करणारे पोलिस कर्मचारी अशा योद्धांचा कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी फेस प्रोटेक्टर या साधनाचा चांगला उपयोग होवू शकतो हा हेतू समोर ठेवून आपण देखील समाजाचे देणे लागतो हा हेतू ठेवत श्री. संताजी महाराज बहु. संस्थेचे अध्यक्ष तथा कोमल मेडीकलचे संचालक प्रविण राजाराम चौधरी व गोजराई क्लिनीकचे डाॅ.मिलींद भिका चौधरी याच्यातर्फे पोलिस विभागातील कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी, आणि न.पा.विभागातील शहरात अन्न वाटप करणारे कर्मचारी या कोरोना योद्धांना फेस प्रोटेक्टर देण्यात आले. दि.20 रोजी सायं.5 वाजता पारोळा पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे साहेब, एपीआय बागुल साहेब, पीएसआय दातीर साहेब यांच्या उपस्थितीत सर्व स्टाॅपला फेस प्रोटेक्टर देम्यात आले. तसेच पारोळा कुटीर रुग्णालय येथे मेडीकल आॅफीसर डाॅ.योगेश साळुंखे, डाॅ.चेतन महाजन, डाॅ.निखील बोहरा यांच्या उपस्थितीत कुटीर रुग्णालयातील कर्मचार्यांना फेस प्रोटेक्टर देण्यात आले. तसेच बालाजी संस्थानतर्फे शहरातील गरजुंना अन्न वाटप करणार्या पारोळा न.पा.कर्मचार्यांना फेस प्रोटेक्टर देण्यात आले. यावेळी कर्मचारी सचिन चौधरी, रमेश किळकर, किरण कंडारे, रवि इंगळे, आकाश चौधरी, जावेद मेहतर उपस्थित होते. यावेळी प्रविण चौधरी, डाॅ.मिलींद भिका चौधरी, कमलेश चौधरी, सुशांत चौधरी, चेतन वैष्णव, गणेश चौधरी, तौसीब खान आदी उपस्थित होते.






