Kolhapur

भूदरगङ तालूक्यात एक दिवशीय स्वसंरक्षण प्रशिक्षण संपन्न

भूदरगङ तालूक्यात एक दिवशीय स्वसंरक्षण प्रशिक्षण संपन्न

कोल्हापूरः आनिल पाटील

स्त्रीयांवरील होणाऱ्या वाढत्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. एखादा अत्याचार झाल्यानंतर कॅन्डल मार्च काढून लढण्यापेक्षा तशी घटना तसेच संकट आल्यावर आपण काय करावे याचे स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतले तर येणाऱ्या प्रसंगी लढण्याचे बळ मिळेल. याच अनुषंगाने अनंतशांती सेवा संस्था व क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे संस्था संचलित मर्दानी आखाडा यांचे संयुक्त विद्यमाने भुदरगड तालुक्यातील कोळवण येथील विद्यार्थिनींना एक दिवशीय स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे संस्थेच्या काजल पाटील, सानिका पाटील, गायत्री पाडळकर, वैष्णवी सरनाईक या रणरागिणीनी स्वसंरक्षणाची काही प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची वाहवा मिळवली .

यावेळी लाठीकाठी दांडपट्टा तलवार भाला फरि गदगा इत्यादी शस्त्रांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याच बरोबर आपल्याकडे कोणतेही शस्त्र नसताना कशा पद्धतीने दोन हात करून परिस्थितीवर मात करायची याचे खास प्रशिक्षण देण्यात आले. इथून पुढे *प्रत्येक मराठी शाळेमध्ये अशा प्रकारचे प्रशिक्षण देणार असल्याचे फिरंगोजी शिंदे संस्थेचे वस्ताद प्रमोद पाटील यांनी यावेळी सांगितले.

तसेच येणाऱ्या उन्हाळी सुट्टीमध्ये दहा दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबीर आयोजित करणार असल्याचे अनंतशांती चे अध्यक्ष भगवान गुरव यांनी बोलताना सांगितले.

या कार्यक्रमासाठी सरपंच दिनकर गुरव, आर.के.पाटील. शीतल पाटील, सागर गुरव, मृणाल पाटील, सानिका जाधव, पूर्णानंद जाधव,करण देसाई,अनुज पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button