Kolhapur

कोल्हापूर: “न्युज पेपर गंगाधर साहित्य परिषद कोल्हापूर येथे संपन्न!”

कोल्हापूर: “न्युज पेपर गंगाधर साहित्य परिषद कोल्हापूर येथे संपन्न!”

कोल्हापूर ःप्रतिनिधी

आनिल पाटील

न्युज पेपर गंगाधर आयोजित पाहिले मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 15 डिसेंबर 2019 रोजी शहाजी कॉलेज येथे यशवंतराव चव्हाण हॉल मध्ये संपन्न झाला.
या संमेलनाचे आयोजन न्युज पेपर गंगाधर चे संपादक कमलाकर वरटेकर, मुख्य व्यवस्थापक दीपक लोखंडे, उपसंपादक श्री विजय बुरुड, स्वागताध्यक्ष प्रशांत नाईक, संयोजक प्रा.डॉ. स्मिता सुरेश गिरी यांनी केले.
या संमेलनाचे उदघाटन जेष्ठ साहित्यीक मा.श्री. श्रीपाल सबनीस, शिवाजी विद्यापीठ चे उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, शिवाजी विद्यापीठ वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीरंग यादव व प्राचार्य जयश्री चव्हाण,उपस्थित माननीय, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत छ. शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून झाला.
या परिषदेचे पाहिले पुष्प साकारताना सर्व उपस्थितांचे स्वागत प्रा. प्रशांत नाईक यांनी अत्यंत रोचक व योग्य पद्धतीने करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाध्यक्ष श्री सबनीस सर यांनी त्यांनी त्यांचे विचार मांडताना, जाती धर्माला बाजूला सारत माणुसकीच्या पायावर आधारलेली संस्कृती प्रस्थापित करण्याची जबाबदारी नव्या पिढीने घेतली पाहिजे व लोकशाही धोक्यात आलेली असताना सर्वांनीच लोकशाहीला पायदळी तुडवू पाहणाऱ्यांना रोखले पाहिजे असे प्रतिपादन केले.
यावेळी पुढे बोलताना डाॕ.श्रीपाल सबनीस म्हणाले शेतकऱ्यांच्या आत्महत्यामुक्त भारत निर्माण करण्याचे आव्हान साहित्यिकांच्या विचारांमध्ये आहे. महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात यासाठी साहित्यिकांनी समाजातील प्रश्नांवर परखडपणे भाष्य करावे. प्रा. डॉ. सौ. स्मिता सुरेश गिरी यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी शिवाजी विद्यापीठ उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे सर, वनस्पती विभागप्रमुख डॉ. श्रीरंग यादव सर, प्राचार्य मंगला पाटील, प्राचार्य जयश्री चव्हाण, डी. वाय. पाटील कॉलेज चे उपप्राचार्य अभिजीत गुटेपाटील, शिवाजी विद्यापीठ रसायनशास्त्र प्लेसमेंट सेल प्रमुख डॉ. राशींकर सर, प्रोजेक्ट कौन्सिल डॉ. गरडकर सर, डॉ. आर. माने सर, प्रा. डॉ. स्मिता गिरी, विवेकानंद कॉलेजचे डॉ भाऊसाहेब गोसावी, डॉ. आरिफ महात डॉ. लाड, डॉ. मनीषा पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते शिक्षक साहित्यिक म्हणून प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.
डाॕ.अच्युत माने, व्यंकाप्पा भोसले, डाॕ.बी.आर.गाडवे, श्री.रमाकांत घोलप, चंद्रकांत रेडेकर, डाॕ.बाबूराव घुर्के, सामाजिक कार्यकर्त्या सौ. स्मिता जयंत लंगडे यांचा व यांच्यासह जिल्ह्यातील 100 आदर्श ग्रंथपालांचा सत्कार करण्यात आला.
दुसऱ्या सत्रात डाॕ.व्ही.ए.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली’साहित्य आणि सामाजिक परिवर्तन’ या विषयावर परिसंवाद झाला. साहित्यिक परिषदेचेअत्यंत स्पष्ट शब्दात दुसरे पुष्प साकारताना नामवंत साहित्यिक रजिया पटेल म्हणाल्या ,” साहित्य हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. महात्मा फुले यांच्या साहित्यातून परिवर्तनाचा विचार व्यक्त होतो.
समाजातील अनिष्ट रुढी परंपरांना संपविण्यासाठी साहित्यिकांनी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. यावेळी प्रा.किसन कुराडे यांनी मांडणी केली.
श्री.पांडूरंग गांजवे यांनी संत साहित्यावर तर डाॕ. संपतराव गायकवाड यांनी शिक्षणावर व्याख्यान दिले. डॉ. स्मिता गिरी यांनी आभार मानताना साहित्य हे संत व समाज संस्कारांनी निर्माण व्हावे असे भाष्य केले.
तिसरे संमेलनाचे पुष्प काव्यसम्मेलन याने सर्व कार्यक्रमाची रंगत वाढवली. तरुण तडफदार कवी श्री. नितीन चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले.बालाजी मुंडे, अनिल चवळे, श्री. पी.एस.कांबळे,प्रा.डाॕ.स्मिता सुरेश गिरी यांच्या कवितांना रसिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. राजेसाहेब कदम यांच्या बहारदार सूत्रसंचलनाने कवीसंमेलनाची रंगत वाढविली.
समारोपाच्या सत्रात प्रमुख पाहूणे म्हणून बोलताना मा. अभिजित हेगशेट्ये म्हणाले धर्मनिरपेक्षता व विज्ञाननिष्ठा रुजविण्यासाठि अशी साहित्य संमेलन उपयुक्त ठरतील. विचारांची मुस्कटदाबी सुरु असाताना सत्तेला विरोध करण्याची तयारी व समाज बदल होत असताना अत्यंत शांतपणे समाज प्रगतीशील राहील अशी भावना साहित्यिकांनी तसेच राजकारण्यांनी ठेवली पाहीजे यामध्ये शिक्षकाचा वाटा हा अत्यंत मोलाचा व संयमाचा ठरतो असे सांगितले.
यावेळी न्युज पेपर गंगाधर संपादक मा. श्री. कमलाकर वरतेकर व त्यांचे सर्व सहकारी यांची अनमोल सहकार्य लाभले, त्यांच्यासाहित अनेक मान्यवर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहित्य व काव्य यांच्या चर्चेत अत्यंत यशस्वीपणे या परिषदेची सांगता झाली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button