Amalner

अमळनेर पोलीस विभागा वर पडतोय अतिरिक्त कामांचा भार त्यामुळे मुख्य कर्तव्याकडे होते दुर्लक्ष…त्यातच  संख्या बळ कमी…

अमळनेर पोलीस विभागा वर पडतोय अतिरिक्त कामांचा भार त्यामुळे मुख्य कर्तव्या कडे होते दुर्लक्ष…त्यातच संख्या बळ कमी…

प्रा जयश्री साळुंके

अमळनेर शहरात सध्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. अवैध धंदे, मटका,जुगार इ सोबतच इतर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. यासाठी सामान्य नागरीकच नव्हे तर सर्वच राजकीय, सामाजिक,वैचारिक क्षेत्रातील लोक पटकन पोलीस विभागावर खापर फोडून मोकळे होतात. परंतु खरी स्थिती जाणून घेणे देखील आवश्यक आहे. त्यातील काही महत्वाचे विषय खालील प्रमाणे

अमळनेर पोलीस विभागा वर पडतोय अतिरिक्त कामांचा भार त्यामुळे मुख्य कर्तव्याकडे होते दुर्लक्ष...त्यातच  संख्या बळ कमी...

? सध्या अमळनेर पोलीस विभागातील कर्मचारी संख्या फक्त 60 एव्हढी आहे आणि पटावर पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या शहरच्या विस्तारा नुसार आणि नियमानुसार 120 एव्हढी आवश्यक आहे.याचाच अर्थ निम्मे पोलीस कमी आहेत त्यातही महिला पोलीस फक्त एकच आहे. एकूणच शहराचा विस्तार आणि गुन्हे पाहता पोलीस संख्या बळ वाढविणे आवश्यक आहे.

? अमळनेर येथील पोलीस विभागावर अतिरिक्त कामांचा बोझ वाढत आहे. राज्य उत्पादन विभाग, अन्न सुरक्षा विभाग आणि विभागीय परिवहन कार्यालय यांचे कोणतेही योगदान किंवा कार्य तालुक्यात दिसून येत नाही. एव्हढेच काय तर अन्न सुरक्षा आणि आर टी ओ यांचे कार्यालय किंवा कोणतेही कर्मचारी तालुका पातळी वर कार्यरत नाहीत .आर टी ओ चे कर्मचारी गावा बाहेर रस्त्यांवर वर्षातून एक दोन वेळा कलेक्शन करतात आणि निघून जातात असे वाहन धारकांचे म्हणणे आहे. राज्य उत्पादन विभाग शहरात असूनही सामान्य लोकांना ह्या विभागा बद्दल माहिती नाही. त्यामुळे दारू किंवा इतर तक्रारी सरळ अमळनेर,मारवड पोलीस ठाण्यात केल्या जातात.

? अमळनेर शहराचे पोलीस कार्यालय हे शहरापासून 3 की मी अंतरावर आहे.त्यामुळे गावात दरारा किंवा धाक राहत नाही.मुख्य पोलीस ठाणे हे शहरातच मध्यवर्ती ठिकाणी असणे आवश्यक आहे.याठिकाणी अनेक सुविधांचा अभाव आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचा जाण्या येण्यात वेळ तर जातोच परंतु एखाद्या इमर्जन्सी मध्ये आरोपी देखील पळून जातो.

? अमळनेर शहरात आता हेल्मेट सक्ती चे आदेश काढण्यात आले आहेत याचाही अतिरिक्त भार अमळनेर पोलीस कर्मचारी यांच्या वर पडणार आहे.

? या सर्व वरील गोष्टींचा परिणाम पोलीस निरीक्षक, अधीक्षक,कर्मचारी यांच्या आरोग्यावर आणि कौटुंबिक जीवनावरही मोठ्या प्रमाणात होत आहे.

अमळनेर पोलीस विभागा वर पडतोय अतिरिक्त कामांचा भार त्यामुळे मुख्य कर्तव्याकडे होते दुर्लक्ष...त्यातच  संख्या बळ कमी...

या सर्व विचार मंथनातून असे निदर्शनास येते की अमळनेर येथील पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या कडे मुख्य कार्य म्हणजे शहरात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करणे,गुन्ह्यांचे प्रमाण कमी कसे होईल यासाठी प्रयत्न करणे ह्या कामांऐवजी दुसरेच कार्य अधिक करावे लागत आहे. कालच जिल्हा पोलिस अधीक्षक मा पंजाबराव उगले यांच्याशी महाराष्ट्र मराठी 7 च्या संपादिका प्रा जयश्री साळुंके यांनी या विषयी माहिती दिली आहे. सामान्य नागरिकांमधूनही वरील मागण्या वारंवार होत आहेत. तरी जिल्हा प्रशासनाने या सर्व गोष्टी विचारात घेऊन कार्यवाही करावी आणि अमळनेर तालुक्यातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अमळनेर तालुक्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वरील अतिरिक्त कार्याचा भार कमी करून त्या त्या विभागाला संदर्भित आदेश द्यावेत ही मागणी आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button