Maharashtra

शिरुड मधिल काही बेजबाबदार नागरीकांमुळे गावाला पुन्हा लागले कोरोनाचे ग्रहण

शिरुड मधिल काही बेजबाबदार नागरीकांमुळे गावाला पुन्हा लागले कोरोनाचे ग्रहण

प्रतिनिधी रजनीकांत पाटील

अमळनेर तालुक्यातील शिरूड येथिल महिन्याभरापुर्वी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला असता त्याचेवर जळगांव येथे कोव्हिड रुग्णालयात 14 दिवस ऊपचार करून निगेटिव्ह होऊन सुखरुप परत आल्याने गावाने मोकळा श्वास घेतला होता. मात्र काही दिवसानंतर आज शिरूड गावात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला व एक रुग्ण पाँझीटिव्ह आला आहे. त्यामुळे गावात धोक्याची घंटा वाजली असुन सदर आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एक डॉक्टर व रिक्षा चालक सह गावातील 12 जणांना कॉरोन्टीन करून त्यांचे स्वँब तपासणी साठी पाठवण्यात आले आहेत. व ईतर 11 जणांना गावातच होम काँरंटाईन केले आहे.यामुळे शिरुड वासियांसमोर नवे संकट ऊभे राहिले आहे. त्यामुळे सर्व नागरीक हवालदिल झाले आहेत. प्रत्येकाने घरातच राहुन , मास्क वापरुन व सोशल डिस्टंसींगचे पालन करण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button