शासनाच्या अशैक्षणिक धोरणाविरोधात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ लढा उभारणार : एस.डी. लाड
सुभाष भोसले -कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्याभवन ( मुख्याध्यापक संघ)शिवाजी पार्क कोल्हापूर येथे विविध शैक्षणिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सभा आयोजित केली होती. या सभेसाठी ३२ शिक्षक सघटनांचे पदाधिकारी शैक्षणिक प्रश्नांची चर्चा करण्यासाठी उपस्थित होते.
शैक्षणिक व्यासपीठ अध्यक्ष एस.डी. लाड म्हणाले सेंट्रल किचनला विरोध व महिला बचत गटाला पूर्वीप्रमाणे पोषण आहाराचा ठेका मिळावा,वेतनेत्ततर अनुदान नियमितपणे मिळावे, आरटीई अॅक्टनुसार दर तीन वर्षांनी मान्यता घेणे धोरण रद्द करावे, सदरची मान्यता घेण्याचे धोरण पाच वर्षाने करावे व सदर मान्यता घेणेसाठी लागणारी कागदपत्रे फोटो एखदाच द्यावेत त्याची दरवेळेला कागदपत्रे देण्याची आवश्यकता नसावी ,पवित्र पोर्टलनुसार शिक्षक भरती करण्यास नागपूर खडपिठाने विरोध केल्यामुळे पूर्वीप्रमाणेच शिक्षक भरती करण्याचे अधिकार शिक्षण संस्थाचालकांना ताबडतोब दयावेत, कायम विनाअनुदानित शाळांना पूर्ण अनुदान दयावे,नैसर्गिक वाढीनुसार हे अनुदान ताबोडतोब दयावे, शिक्षकेत्तर सेवकांची भर्ती ताबोडतोब सुरू करावी,कमी पटाच्या शाळा कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद करू नये ,पेन्शन पेपर्स व रिवायज पेन्शन पेपर्स वेतनपथकाकडे दाखल झाले नंतर दोन महिन्याच्या आत मंजुरीसाठी महालेखापालांच्याकडे ताबोडतोब पाठवावीत,२५ टक्के आरक्षणातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी ची प्रतिपूर्ती शासनाने ताबोडतोब करावी, पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या एस एस सी व एच एस सी फी बोर्डाकडून पूर्ण माफ व्हावी.आदी मागण्यावर सविस्तर चर्चा झाली.
या सभेस दादासाहेब लाड ,वसंतराव देशमुख ,जयंत आसगांवकर, सुरेश संकपाळ ,दत्ता पाटील, आर. वाय .पाटील, शिवाजी माळकर, व्ही जी पाटील, बी. डी .पाटील, डॉ. प्रा.सुभाष जाधव, सुधाकर निर्मळे, मिलींद बारवडे ,भाऊसाहेब सकट, गजानन काटकर, राजेश वरक, मनोहर जाधव ,मिलींद पांगिरेकर ,नंदकुमार गाडेकर, डॉ संतोष जेठीथोर, सर्जेराव जाधव ,एम.आर. पाटील, इरताज अन्सारी ,डी.एम. थडके, पी.आर. पाटील, प्रताप जगताप, जितेंद्र म्हैशाळे, मनोहर जाधव,आय.एम. गायकवाड आदी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.






