Amalner

मांडळ गावात गाय,म्हैस, बैल या जनावरांना लाळखुरकत लसीकरण व टॅगिंग चा कार्यक्रमाला सुरुवात झाली.

मांडळ गावात गाय,म्हैस, बैल या जनावरांना लाळखुरकत लसीकरण व टॅगिंग चा कार्यक्रमाला सुरुवात झाली.

Amalner : आज दि.२४/११/२०२० वार मंगळवार रोजी मांडळ गावात गाय,म्हैस, बैल या जनावरांना लाळखुरकत लसीकरण व टॅगिंग चा कार्यक्रमाला सुरुवात झाली. अमळनेर तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी प्रतिभा कोरे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या त्या प्रथम महीला पशुवैद्यकीय अधिकारी अमळनेर तालुक्याला लाभल्यामुळे मांडळ गावातील महीला सौ. चारुशिला पाटील,सौ. सरला पाटील,पं.स.माजी सभापती डॉ.दिपक पंढरीनाथ पाटील ,सुरेश पाटील यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. व शिबिरास सुरुवात केली. दिवस भरात जवळपास ३५० जनावरांना लसीकरण व टॅगिंग करून झाले. या कार्यक्रमाला सहकार्य म्हणून डॉ.प्रशांत बर्गे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी वावडे,डॉ.दिपक पंढरीनाथ पाटील,डॉ.सुनिल पाटील,डॉ.भुषण जोशी, डॉ.शिवरत्न पाटील,डॉ.विक्रांत पाटील तसेच श्रीवंत आनंद परिचर वावडे यांनी मोलाचे सहकार्य केले. मांडळ गावात एक दिवस आधी या कार्यमाची दवंडी देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी आपापली जनावरे घरीच राहू दिली होती.म्हणून मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ग्रामस्थांनी महीला डॉक्टरांची व संपूर्ण टिमचे कौतुक केले. मागच्या दहा वर्षांत मांडळ येथे असे शिबिर झाले नाही असे आजचे शिबिर झाले.येणाऱ्या काही दिवसात संपूर्ण परिसर पूर्ण करण्यात येईल असे डॉक्टरांनी सांगितले. सदर कार्यक्रमाला गावातील सुरेश पाटील,सुरेश कोळी,चेतन कोळी,सुनिल कोळी,योगेश कोळी,मधुकर पाटील, त्र्यंबक पाटील, शेखर पाटील,सुनिल पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button