Amalner

?️ प्रेरणादायी…शेतकऱ्याच्या मदतीला धावले देवदूतांचे देवदूत कृषिभूषण साहेबराव पाटील….

माजी आमदार पाटील यांनी वाघोदे व चिखलोड येथे वादळात पडलेले वीज खांब उभे करून दिली 12 हजार रुपयांची शेतकऱ्यांसाठी मदत

प्रतिनिधी नूरखान
अमळनेर मतदार संघातील वाघोदे येथील माजी शेतकी संघ संचालक श्रीराम पाटील व चिखलोड बु येथील शेतकरी वाल्मिक मधुकर पाटील यांनी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी केलेल्या विजवितरण कंपनीला स्वतः मजुरी देऊन वादळात पडलेल्या वीज खांब दुरुस्त करून घेतला.या त्यांनी केलेल्या निस्वार्थी मदतीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

मतदार संघात गेल्या वीस दिवसा पासून झालेल्या वादळी चिखलोड व वाघोदे पावसामुळे वाल्मिक पाटील शेतातील तब्बल पाच वीज पोल पडले होते. महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या मागे ते वीस दिवसापासून पाठपुरावा करत होते पण महावितरणचा एक ही कर्मचाऱ्यांने लक्ष शेतकऱ्याकडे लक्ष दिलं नाही.

वीस दिवसापासून वाल्मिक पाटील व वाघोदे येथील श्रीराम पाटील यांच्या शेतशिवारात इतर शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना पाणी नव्हते. दोघांनी शेवटी माजी आमदार साहेबराव पाटील यांना संपर्क साधला. त्यांनी त्या शेतकऱ्यांची समस्या जाणून महावितरण कंपनीच्या मजुरांसोबत संपर्क साधत सदर बाब माजी आमदार पाटील यांनी वाघोदे येथे 7 हजार रु व चिखलोड येथे पाच हजार रुपये असे 12 हजारांचीची मजुरी मजुरांना देत स्व खर्चाने अवघ्या दोन तासात त्यांच्या समस्याचे निवारण केले. दोन्ही शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत सुरू करून दिला.

वाघोदे व चिखलोद शिवारातील शेतकरी व तक्रार करण्याऱ्या शेतकऱ्यांच्या वतीने माजी आमदार साहेबराव पाटील यांचे आभार व्यक्त करत त्यांनी असा जनतेचा संवेदनशील नेता पुन्हा अमळनेर नगरीला शेतकऱ्यांसाठी पुन्हा प्राप्त व्हावा असे उद्गार काढले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button