ऍड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे ध्वजारोहन संपन्न…!
विद्यार्थ्यांनी नोंदविला ऑनलाईन सहभाग…!
रजनीकांत पाटील
अमळनेर-येथील अॅड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे भारताचा ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अॅड ललिता पाटील तसेच सचिव प्रा शाम पाटील,संचालक पराग पाटील,उपाध्यक्षा देवेश्री पाटील,प्राचार्य विकास चौधरी,प्रशासन अधिकारी अमोल माळी,क्रिडा शिक्षक व्हि एन सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी संपूर्ण देशात कोरोणा संसर्ग रोखण्यासाठी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ह्या कार्यक्रमास मुकावे लागले परंतु संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत व्हिडिओ लाईव्ह काॅन्फरंस च्या सहाय्याने सर्व विद्यार्थ्यांना लिंक पाठवून ह्या कार्यक्रमात सहभागी करण्यात आले.विद्यार्थ्यांनी स्कुल युनिफॉर्म मधे वेळेवर तयार राहुन ह्या कार्यक्रमात उत्साहात सहभाग नोंदविला.स्कुलचा फेसबुकवर अकाऊंट वरुन देखील लाईव्ह प्रक्षेपण सुरु होते.सर्वांनी भारत माता की जय,वंदे मातरम च्या घोषणा देत ऑनलाईन पद्धतीने देशभक्तीचा एक अनोखा संदेश दिला.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अॅड ललिता पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत सध्याच्या परिस्थितीत मनामधे सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले.विक्रम संदानशिव यांनी देशभक्तीपर गीत सादर केले तसेच यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परीश्रम घेतले.






