Amalner

?️अमळनेर कट्टा..स्व. उदय वाघ यांच्या फोटो विषयी भाजपा पदाधिकाऱ्यांचे आरोप बिनबुडाचे..प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला खुलासा…

?️अमळनेर कट्टा..स्व. उदय वाघ यांच्या फोटो विषयी भाजपा पदाधिकाऱ्यांचे आरोप बिनबुडाचे..प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला खुलासा…

इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला बाजार समितीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यानंतर काल दि. 22 फेब्रुवारी 2021 रोजी संपूर्ण प्रशासक मंडळाचा पद्ग्रहण सोहळा पार पडला.

यानंतर काही भाजपा कार्यकर्त्यांकडून स्व. उदय वाघ यांच्या फोटो विषयी चुकीचे वृत्त पसरवून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासंदर्भात खुलासा असा की,

मा. आ. अनिल दादा पाटील यांच्या प्रयत्नाने नवीन प्रशासक मंडळाची नियुक्ती झाल्यानंतर दि. 16 फेब्रुवारी 2021 रोजी प्रशासक मंडळाने पदभार स्वीकारला. यावेळी प्रत्येक्षात कुठलाही फोटो मुख्य प्रशासक यांच्या दालनात अस्तित्वात नव्हता, तो शासकीय प्रशासक काळात प्रशासकांकडून आधीच काढून टाकण्यात आला होता. त्यामुळे स्व. उदय वाघ यांच्या फोटो विषयी प्रसिद्ध होत असलेली बातमी निराधार आहे.

सोशल मिडीयावर निषेध व्यक्त करत असतांना काही समाज कंटकांनी आमदार अनिल दादा पाटील व प्रशासक मंडळाविषयी आक्षेपार्ह्य मजकूर टाकला आहे. अशांवर कायदेशीर कारवाई करण्याचे प्रशासक मंडळाने ठरविले आहे.

निषेध व्यक्त करण्याचा नादात भाजपाचा काळा चेहरा समोर.

परंपरेनुसार एखाद्या व्यक्तीचा सभापती पदाचा पदभार संपुष्टात आल्यानंतर नवीन नियुक्त झालेल्या सभापतींनी सभेत ठराव मंजूर करून विशिष्ट कार्यक्रमाचे आयोजन करून माजी सभापतींचा फोटो सभागृहात लावणे अपेक्षित असते.

स्व. उदय वाघ यांचा कार्यकाळ संपल्याच्या नंतर आलेल्या भाजपच्या सभापतींनी ते करणे अपेक्षित होते. परंतू, अनेक महिने सत्ता उपभोगत असतांना देखील एकदाही असा ठराव तत्कालीन सभापतींनी केल्याचे आठळून आले नाही. भाजपानेच स्व. बापूंना योग्य सन्मान दिलेला नाही.

असे असले तरी, योग्य वेळी आशा पद्धतीचा ठराव करून स्व. उदय वाघ यांचा फोटो लावून महाविकास आघाडीच्या वतीने भाजपा कडून हिरावण्यात आलेला सन्मान त्यांना मिळवून दिला जाईल असे संपुर्ण प्रशासक मंडळाचे मत आहे.

स्व. उदय बापूंनी दिलेल्या सन्मानाचे जतन
उलटपक्षी, मा. हरी भिका वाणी यांनी २५ वर्षे संचालक म्हणून बाजार समितीत सेवा प्रदान केल्या बद्दल स्व. उदय बापू यांनी सन्मानपूर्वक त्यांचा फोटो सभागृहात लावला होता जो पुढील काळात तत्कालीन भाजपा सभापतींच्या कार्यकाळात काढून टाकण्यात आला होता.
पदग्रहण सोहळा पार पडण्या पूर्वीच तो फोटो पूर्ववत सभागृहात लावून स्व. उदय बापूंनी एका जेष्ठ संचालकास दिलेल्या सन्मानाचे जतन करण्याचे कार्य महाविकास आघाडीच्या प्रशासक मंडळाने केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button