Pune

इंदापूर तालुक्यात कोरोनाने खाते उघडले. भिगवण स्टेशन परिसरात कोरोनाची महिलेस लागण

इंदापूर तालुक्यात कोरोनाने खाते उघडले. भिगवण स्टेशन परिसरात कोरोनाची महिलेस लागण

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे:आजपर्यंत पुणे शहर व जिल्ह्याच्या आसपासच्या भागात कोरोनाने धुमाकूळ घातला असतानाच इंदापूरमध्ये एकही रुग्ण नसल्याने इंदापूरकरांना दिलासा मिळाला होता. तो दिलासा आज कोरोनाने हिसकावून घेतला. इंदापूर तालुक्यातील पहिला कोरोना रुग्ण भिगवण परिसरात आढळला.
आज भिगवण स्टेशन परिसरातील एका महिला रुग्णास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती येथे उपचारासाठी गेलेल्या या महिला रुग्णास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णास पुण्यात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याच्या घशातील द्रवाचे नमुने घेण्यात आले होते. तेथे तपासणी केल्यानंतर या रुग्णास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान शेजारच्या बारामती तालुक्यात रुग्ण मिळिले होते त्यातच आज (ता.२८) पर्यंत म्हणजे जवळपास १४ दिवस बारामती शहरात एकही कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण आढळला नसल्याने बारामती कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर असतानाच आज इंदापूरमध्ये कोरोनाने खाते उघडल्याने आता पुन्हा चिंतेचे काहूर निर्माण झाले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button