Amalner

?️अमळनेर कट्टा..धूम..धूम..मचाले..धूम मचाले..निवडणूकीत व्यस्त प्रशासनाचा गैरफायदा घेत वाळू माफियांची बोरी पांझरेत धूम..धूम…

?️अमळनेर कट्टा..धूम..धूम..मचाले..धूम मचाले..निवडणूकीत व्यस्त प्रशासनाचा गैरफायदा घेत वाळू माफियांची बोरी पांझरेत धूम..धूम…

अमळनेर येथील बोरी नदी आणि पांझरा नदी पात्रात सतत अवैध वाळू उपसा होत असतो.परंतु अमळनेर चे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चालविलेल्या मिशन वाळू मुळे गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वाळू उपसा थोड्या प्रमाणात बंद झाला होता. परंतु काल दि 15 जाने 2021 रोजी अमळनेर तालुक्यात 67 ग्राम पंचायतींची निवडणूक होती.या पार्श्वभूमीवर सर्व महसूल अधिकारी कर्मचारी,पोलीस अधिकारी, कर्मचारी निवडणूक कामात दिवसभर व्यस्त होते.गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक काम सुरू असल्याने थकलेले अधिकारी, कर्मचारी काल रात्री उशिरापर्यंत निवडणूक कार्यातून मुक्त होऊन थोडं रात्री निवांत झाले होते याचा गैरफायदा घेत वाळू माफियांनी रात्री आणि सकाळी पहाटे पहाटे मोठ्या प्रमाणात बोरी नदी आणि पांझरा नदीतून वाळू उपसा केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button