Faijpur

पत्रकार दिनानिमित्त महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांच्या हस्ते शहरातील पत्रकारांचा सन्मान

पत्रकार दिनानिमित्त महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांच्या हस्ते शहरातील पत्रकारांचा सन्मान

फैजपूर सलीम पिंजारी

येथील सत्पंथ ट्रस्ट तर्फे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी दिनांक 9 जानेवारी रोजी शहरातील पत्रकारांचा छोटे का खाली कार्यक्रम आयोजित केला होता महाराजांनी केलेल्या या सन्मानाच्या कार्यक्रमाला शहरातील सर्वच पत्रकार उपस्थित होते महाराज यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले की पत्रकार दिन हा सहा जानेवारी मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्म दिन म्हणून साजरा केला जातो महाराज पुढे म्हणाले की शहरातील पत्रकारांचे योगदान अत्यंत मोलाचे असून अनेक समाजात त्यांची प्रसिद्धी शहरातील पत्रकार निस्वार्थपणे पार पाडत असतात तसेच आपल्या अनेक वेगवेगळ्या माध्यमातून प्रसिद्धी देऊन समाजाला योग्य न्याय देण्याचे कार्य पत्रकारांचे मोलाचे असून म्हणून जनतेच्या विश्वास आजही पत्रकारांवर कायम आहे पत्रकारांनी कोणतीही बातमी टाकली की ती बातमी जनतेला त्याच्यावर विश्वास आहे म्हणून पत्रकार हा भारताचा चौथा आधारस्तंभ मानला जातो म्हणून पत्रकारांचे कार्य समाजात मोलाचे असल्याचे येथील महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी पत्रकारांच्या सन्मान करताना आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी महाराजांनी सर्व पत्रकारांचा सन्मान करून पत्रकारांना ब्लॅंकेट सतपंथ ट्रस्टचे कॅलेंडर पेन देऊन सन्मान केला या सन्मानाला पत्रकार वासुदेव सरोदे समीर तडवी शाकीर मलिक पत्रकार संघाचे अध्यक्ष फारूक शेख सलीम पिंजारी अरुण होले उमाकांत पाटील निलेश पाटील नंदकिशोर अग्रवाल ललित कुमार फिरके संजय सराफ राजू तडवी राजेंद्र तायडे ईदु पिंजारी योगेश सोनवणे का मिल शेख आदी पत्रकार उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button