?️ Big Breakingअमळनेरच्या कोरोना घड्याळात वाजले 13 …रुग्णांची संख्या वाढली….
अमळनेर येथे आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या13 झाली असून अजूनही काही अहवाल यायचे बाकी आहेत.ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले 5 ते 6 कर्मचारी देखील जिल्हा रुग्णालयात स्वॕब तपासणी गेले असून गेल्या दोन दिवसांपासून ते जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांना कोरोंटाईन करण्यात आले आहे.
जळगांव येथील कोविड रुग्णालयात कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब घेतलेल्यांपैकी तीन रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहे. या तिन्ही रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहे.
तिन्ही कोरोना बाधित रूग्ण हे अमळनेर येथील असून यातील एक 17 वर्षीय तरूण आहे तर एक 44 वर्षाच्या पुरूषाचा समावेश आहे तर शहा आलम येथील 65 वर्षाच्या वृद्धाचा समावेश आहे. तिन्ही रुग्ण हे अमलेश्वर ,शाहआलम नगर येथील आहेत. रूग्ण यापूर्वी आढळून आलेल्या अमलेश्वर नगर भागातील कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कातील आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या सोळा झाली असून फक्त अमळनेर तालुक्यातीलच रुग्ण संख्या 13 वर पोहचली आहे. जिल्ह्यातील १६ रुग्णांपैकी फक्त एकच रूग्ण कोरोना मुक्त झाला आहे. चार रूग्णांचा मृत्यू झाला असून उर्वरित रूग्णांवर कोरोना संसर्ग कक्षात उपचार सुरू आहे.
अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.






