Latur

निराधारांचे थकित अनुदान पोष्टाद्वारे तात्काळ घरपोच द्या. – भाजपा नेते व्यंकट पनाळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकड़े मागणी.

निराधारांचे थकित अनुदान पोष्टाद्वारे तात्काळ घरपोच द्या.

– भाजपा नेते व्यंकट पनाळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकड़े मागणी.

लातूर-लक्ष्मण कांबळे

‘कोरोना’ या महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लोकांना घराच्या बाहेर पडता येत नाही. घरातील रेशन व पैसेही संपल्याने लोकांची उपासमार होत आहे. विशेष म्हणजे निराधार, विधवा, परित्यक्ता, अपंग, जेष्ठ नागरिक यांना मिळणारे अनुदान गेल्या पाच महिन्यापासून मिळालेले नाही. त्यामुळे या लोकांचे प्रचंड हाल सुरु आहेत. तरी त्यांना पोष्टाद्वारे तातडीने घरपोच अनुदान देवुन त्यांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी भाजपचे नेते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकट पनाळे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी श्री. जी. श्रीकांत यांच्याकडे केली आहे.
सध्या कोरोनाच्या लॉकडाऊन दरम्यान लातूर जिल्ह्यात देखील गोर- गरीब, निराधार, परित्यक्ता, विधवा, अपंग, ज्येष्ठ नागरीक यांचे अन्नपाण्या वाचून बेहाल होत आहेत. आणि गेल्या तब्बल पाच महिन्यापासून त्यांना शासनाकडून अनुदानच मिळालेले नाही. त्यामुळे त्यांची परिस्थिती अधिकच खालावलेली आहे. तेेंव्हा त्यांचे थकित अनुदान तत्काळ वाटप सुरु करावे.

जसे केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे जनधन लाभार्थीचे पैसे जे बँक खात्यावर आलेले आहेत, ते लाभार्थीना बँकेतून नव्हे तर पोस्टाद्वारे घरपोच दिले जाणार आहेत. असे लातुरचे पालकमंत्री अमित देशमुख यानी सांगितले आहे. त्याप्रमाणेच निराधारांचे अनुदान देखील बँकेतून न देता पोस्टाद्वारे त्यांना घरपोच मिळावेत, अशी मागणी भाजप नेते व्यंकट पनाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकड़े केली आहे.

.. तर निराधारांची लूट थांबेल

निराधारांचे अनुदान जेव्हा जेव्हा त्यांना मिळते, तेव्हा त्यांच्या गावातील दलाल हप्तेखोर लोक बँकेजवळ जाऊन या लाभार्थ्याकडून १००, २०० रुपये वसूल करतात. त्यामुळे निराधाराना बँकेऐवजी पोस्टातून घरपोच अनुदान दिल्यास त्यांची होणारी आर्थिक लूट थांबेल, असेही व्यंकट पनाळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button