आदिवासी आरक्षणात अन्य कोणत्याही जातीचा समावेश करू नका – बिरसा क्रांती दल
पुणे प्रतिनीधी – दिलीप आंबवणे
आदिवासी आरक्षणात अन्य कोणत्याही जातीचा समावेश करू नये, अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री. उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री मा श्री. अजीत पवार, आदिवासी विकास मंञी अॅड.के. सी .पाडवी यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आदिवासींचे आरक्षण हे संविधानिक हक्क असून त्यामध्ये अन्य कोणत्याही जातीची घुसखोरी करू नये.धनगर समाज, बंजारा समाज इत्यादी समाजाचा आदिवासी आरक्षणात समावेश करावा म्हणून शासनस्तरावर मागणी केली जात आहे. धनगर समाजाला स्वतंत्र पणे आरक्षण आहे.तसेच आदिवासी समाजाला अजूनही 7% आरक्षणाचा खरे अर्थाने लाभ मिळालेला नाही. आदिवासी समाजात अनेक गैर आदिवासी यांनी घुसखोरी केली आहे. गैर आदिवासी यांनी आदिवासी आरक्षणाचा गैरफायदा घेतलेला आहे व घेत आहेत.त्यामुळे आदिवासी समाजाच्या प्रगतीला अडचणी निर्माण झाल्या आहेत. आदिवासी समाजाचा विकास करण्यासाठी आदिवासींचे आरक्षण हे आदिवासींनाच देण्यात यावे,अन्य कोणत्याही जातीचा समावेश आदिवासी आरक्षणात करू नये.अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी शासनाकडे केली आहे.






