?️अमळनेर कट्टा..धक्कादायक…20 वर्ष वयाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या..!पोलिसात गुन्हा दाखल..!
अमळनेर येथील गांधलीपुरा येथील प्रशांत संजय धामणे ह्या 20 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की अशोक लोहरे वय 60 यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार ते सेवानिवृत्त कर्मचारी नगरपालीका स गांधलीपुरा राम मंदिर गांधलीपुरा येथे राहतात. त्यांच्या सोबतच मुलगी सौ हेमा संजय धामणे व जावइ संजय लालचंद धोमणे व
नातू संजय धामणे वय 20 असे राहतात.
रोजी रात्री प्रमाणे जेवण करून आम्ही सुमारे 10.00 वाजेचे सुमारास आम्ही सर्व झोपण्यास गेलो तेव्हा मी माझे कामानिमीत सुमारे सत्री 11 वाजता माझा नातू प्रशांत ला फोन लावला असता त्याचा फोन लागला नाही. तेंव्हा राहत असलेल्या वरच्या रूम मध्ये जावून पाहिले असता तो मला दुसरा मजल्याला फॅनला दोरीने लटकलेला दिसला तेव्हा आरडाओरड करून आजु बजुच्या लोकांच्या मदतीने त्यास खाली उतरतुन खाजगी वाहनाने डॉ अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात नेले असता तेथील डाक्टरांनी त्यास ग्रामीण रुग्णालयात घेवुन जाण्यास सांगितले असता डॉ नी प्रशांतला मयत घोषीत केले.
खबरीवरून वर प्रमाणे सिआरपीसी 174 प्रमाणे असू दाखल करण्यात आला असुन 418 सुनिल हटकर यांचे कडेस देण्यात आलेला आहे.






