Pune

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या करणार दौंड व इंदापुर तालुक्यातील नुकसानीची पाहणी.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या करणार दौंड व इंदापुर तालुक्यातील नुकसानीची पाहणी.

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे:माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सोमवारी (दि.१९) रोजी पुणे जिल्हाच्या दौऱ्यावरती येत असून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची ते पाहणी करुन शेतकरी बांधवांशी संवाद साधनार असल्याची माहिती भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांचे सोमवारी सकाळी १० वा. बारामती विमानतळावरती आगमन होईल. त्यानंतर दौंड तालुक्यातील मळद, रावणगाव, खडकी, स्वामी चिंचोली या भागाची नुकसानीची ते पाहणी करतील. त्यानंतर ११.४५ वा. इंदापूर तालुक्यातील सणसर, निमगाव-केतकी परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी करतील. त्यानंतर ते माढा (जि. सोलापूर) तालुक्यातील टाकळी, गारअकोले या भागाची पाहणी करणेसाठी रवाना होतील,अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या या पाहणी दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button