Chalisgaon

जल व निसर्ग संवर्धनासाठीचा चाळीसगाव पॅटर्न राज्यासाठी पथदर्शी ठरेल – जलतज्ञ उपेंद्र धोंडे

जल व निसर्ग संवर्धनासाठीचा चाळीसगाव पॅटर्न राज्यासाठी पथदर्शी ठरेल – जलतज्ञ उपेंद्र धोंडे

चाळीसगाव येथे खान्देशस्तरीय जलसंमेलन संपन्न

आमदार मंगेश चव्हाण यांच्या शिवनेरी फाउंडेशन संचलित भूजल अभियानाचा उपक्रम

भूजल स्पर्धेत सहभागी चाळीसगाव तालुक्यातील चैतन्य तांडा क्र४, ब्राम्हणशेवगे – नाईकनगर, चिंचगव्हाण सुंदरनगर यांना मिळाली लाखोंची बक्षिसे

प्रतिनिधी : नितीन माळे चाळीसगाव

चाळीसगाव : जलसाक्षरता ही काळाची गरज असून ज्याप्रमाणे गावात डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षक असतात त्याप्रमाणे पाण्याचे ज्ञान असणारे लोक देखील असले पाहिजेत. चाळीसगाव तालुक्यात भूजल अभियानाच्या माध्यमातून जलसाक्षर असणारा प्रशिक्षित वर्ग गावागावात निर्माण झाला तर पुढील काळात आपण जलसंपन्न ठरू यासाठी चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरु झालेला भूजल अभियानाचा चाळीसगाव पॅटर्न राज्यात पथदर्शी ठरेल असे प्रतिपादन भूजल तज्ञ तथा सहज जलबोधकार उपेंद्र धोंडे यांनी केले.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या शिवनेरी फौंडेशन संचालित भूजल अभियान अंतर्गत सहज जलबोध अभियानाच्या माध्यमातून, पहिले खान्देशस्तरीय जल-संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. सदर संमेलन हे चाळीसगाव येथील लक्ष्मीनगर मधील राजपूत मंगल कार्यालय येथे उत्साहात आणि आनंदात संपन्न झाले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्री. बी. एन. पाटील, श्री दिवाकर धोटे उपसंचालक GSDA नाशिक, सौ . अनुपमा पाटील भूजल तज्ञ जळगाव, श्री उपेंद्र धोंडे सहज जलबोधकार पुणे , श्री अनिल भोकरे जिल्हा कृषी उपसंचालक जळगाव, तसेच तालुक्याचे प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे आणि गटविकास अधिकारी श्री नंदकुमार वाळेकर यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

संमेलनाचे उद्घाटन मागील वर्षी भूजल स्पर्धेत चाळीसगाव तालुक्यात सहभागी झालेल्या ११ गावात निर्माण झालेल्या पाणीसाठ्या मधून आणलेल्या पाण्याचे मंचावर निर्माण केलेल्या कृत्रिम तलावात जल पूजन करून करण्यात आले. तसेच मागील वर्षी चाळीसगाव तालुक्यात भूजल अभियानाच्या वतीने करण्यात आलेल्या कामांची माहिती देणारी चित्रफित व गाण्याचे प्रक्षेपण देखील करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ.बी.एन.पाटील साहेबांनी स्वीकारले तर उपेंद्र धोंडे यांनी सहज जलबोध अभियाना बद्दल मार्गदर्शन केले , तसेच गुणवंत सोनवणे संगणक अभियंता पुणे यांनी मागील वर्षी भूजल अभियानाच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यात झालेल्या कामाचा प्रवास आणि पुढील वर्षी होणाऱ्या कामांची माहिती सांगितली , मागील वर्षी सुरू झालेल्या शिवनेरी फौंडेशन संचलित भूजल अभियाना अंतर्गत ज्या गावांनी जल संधारण आणि मृदा संधारण चे स्पर्धे दरम्यान उकृष्ट दर्जाची कामे केली त्या गावांत प्रथम पारितोषिक चैतन्य तांडा क्र.०४ ला १ लाख ५१ हजार रु, द्वितीय पारितोषिक ब्राम्हण शेवगे-नाईकनगर येथे १ लाख १ हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक सुंदरनगर-चिंचगव्हान ७५ हजार रु. या गावांनी पटकावले त्या बद्दल तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी गावांचे अभिनंदन तसेच कौतुक केले आणि पुढील भूजल अभियानाच्या प्रवासा साठी तालुक्यातील निवड करण्यात आलेल्या २६ गावांना शुभेच्छा दिल्या. विठ्ठलाची वारी ही कुणाच्या मालकीची नसते तसेच त्यात जात / पात, पक्ष / भेद देखील नसतो त्याच शुद्ध अंतकरणाने ही जलवारी सुरु केली असून तालुक्यात सुरू झालेल्या या जल चळवळी साठी सगळ्याच राजकीय, सामाजिक आणि शासकीय क्षेत्रांतील लोकांनी पुढें यावं यासाठी आवाहन केले, तसेच पुढील काळात शासकीय मदतीच्या पलीकडे जावून नावासाठी नाही तर गावासाठी हे ब्रीदवाक्य घेत जल व निसर्ग संवर्धनासाठी सर्वोत्तपरी मदत देण्याचे आश्वासन देखील दिले.

जल संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात शासकीय पातळीवर ग्रामविकासासाठी महत्वाच्या असणाऱ्या या अभियानाला सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली तसेच कृषी उपसंचालक अनिल भोकरे साहेब यांनी उपलब्ध असणाऱ्या पाण्याचे नियोजन व पिकपद्धती यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे वक्ते म्हणून जितेंद्र पाटील ( तांत्रिक प्रशिक्षक, भूजल अभियान चाळीसगाव ) यांनी आदर्श भूजल आराखडा या विषयावरती मार्गदर्शन केले तसेच भागवत बैरागी कुंझर यांनी तलाव पुनर्भरण आणि योगेश सोनवणे कळमडू यांनी निसर्गबेट यावरती मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे जलसंमेलनात मार्गदर्शन करणारे वक्ते हे चाळीसगाव तालुक्यातीलच प्रशिक्षित वक्ते असल्याने पुढील काळात त्यांची मदत तालुक्यातील चळवळीला होईल असा आशावाद आयोजकांचा होता.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजय कोळी अभियान प्रमुख चाळीसगाव यांनी केले तसेच उपस्थित मान्यवरांचें आणि कार्यक्रमाला आलेले सगळेच जलप्रेमी आणि निसर्गप्रेमी यांचे आभार शिवनेरी फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभा चव्हाण यांनी मानले संमेलन यशस्वीतेसाठी भूजल अभियान कोअर टीम आणि आमदार कार्यालयातील संपूर्ण स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button