Kolhapur

स्वतःतील सुप्तगुणांना ओळखा- डॉ. सुवर्णा पुरोहित

स्वतःतील सुप्तगुणांना ओळखा- डॉ. सुवर्णा पुरोहित

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : सांगली येथील पुरोहित कन्या प्रशालेत वार्षिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ श्रद्धा केतकर यांनी केले. शालेय स्तरावरील विविध परीक्षांमध्ये उज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थिनींना पारितोषिक देऊन डॉ. पुरोहित यांच्या हस्ते गौरवण्यात आले.याप्रसंगी बोलताना डॉ.पुरोहित म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी स्वतःतील सुप्तगुणांना ओळखले पाहिजे. ज्ञान संपादन करत असताना कोणत्याही परिस्थितीत संघर्ष करून पुढे जाण्याची जिज्ञासा व महत्त्वाकांक्षा बाळगल्यास विद्यार्थी नक्कीच उत्तम यश मिळवू शकतील. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीमती पुतळाबेन शाह बी.एड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी मरजे उपस्थित होते. आभार उपमुख्याध्यापक(उ.मा) अनिल मासुले यांनी मानले. तर सूत्रसंचालन सौ.अलका जाधव यांनी केले.पर्यवेक्षक सु.ह.कुलकर्णी उपमुख्याध्यापक भा.गो.घाडगे,शिक्षक दिलीप संकपाळ,प्रदीप थोरात,सौ.मिताली कुलकर्णी आदींनी गुणवत्ता वाचन केले. यावेळी शासनाच्या निर्देशानुसार कोविड प्रतिबंधक सर्व नियम अटी यांचे काटेकोर पालन विद्यार्थिनींनी करून आगळ्या-वेगळ्या शिस्तीचे दर्शन घडविले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button