Amalner

मातृहृदयी पुज्य साने गुरुजी जयंतीनिमित्त अभिवादन..

मातृहृदयी पुज्य साने गुरुजी जयंतीनिमित्त अभिवादन..

रजनीकांत पाटिल अमळनेर

अमळनेर : अमळनेर येथील इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज 24 डिसेंबर रोजी पुज्य साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . सदर प्रसंगी शाळेतील जेष्ठ शिक्षक पी. ए. शेलकर यांच्या हस्ते मातृहृदयी साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला . तद्नंतर मुख्याध्यापक संदीप पवार यांनी पुज्य साने गुरुजींची मनाला, धर्माला , जगाला भावणारी ‘ खरा तो एकचि धर्म ,
जगाला प्रेम अर्पावे ‘ ही प्रार्थना सर्व उपस्थित शिक्षक , शिक्षिका यांच्या समवेत सादर केली . सदर कार्यक्रमाला प्राचार्य नरेन्द्र साळुंखे, व्ही. डी. पाटील, ए. पी. जाधव, पी. एम. ठाकरे, डी. बी. चव्हाण, बी. ए. देशमुख, एस. एस. तेले, बी. एस. चव्हाण, आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रमोद महाजन, अशोक सैंदाने यांनी सहकार्य केले . आणि कार्यक्रम सूत्रसंचालन डी. ए. सोनवणे यांनी केले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button