Nashik

ना.डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत येवला तालुका आढावा बैठक संपन्न

ना.डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत येवला तालुका आढावा बैठक संपन्न

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भारती प्रवीण पवार यांनी येवला तालुका आढावा बैठक घेतली. सदर बैठकीत सर्वसामान्य जनतेच्या भेडसावणाऱ्या सर्वच प्रश्नांवर चर्चा झाली असता अतिवृष्टी पंचनामे, मदत शेतकऱ्यांना मिळाली की नाही, संजय गांधी निराधार योजना, पंतप्रधान आवास योजना, बांधकाम, वीज महावितरण, वन, कोरोना संक्रमण आढावा, मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतून “हर घर दस्तक” अभियाना अंतर्गत कोविड लसीकरण वेगाने करावे अशी सूचना केली. तसेच संबंधित सर्वच विभागाकडून नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. त्याचे निवारण करण्याच्या सूचना ना.डॉ.भारती पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ग्रामीण भागातील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांनी जलजीवन मिशन ही योजना सुरु केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे स्वच्छ पाणी पोहचवण्यासाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे. हियोजना व्यवस्थित राबवावी असे आवाहन ना.डॉ.भारती पवार यांनी ह्याप्रसंगी केले. या आढावा बैठकीत प्रत्येक गावाचा गावनिहाय लसीकरणाचा आढावा घेण्यात आला. पूर्व सूचना न देता डीपी बंद करू नका अशा सूचना वीज वितरण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच बैठकीत जिल्ह्यातील पीक – पाहणी आढावा, अतिवृष्टीमुळे शेतीचे, घरांचे, पशुधन नुकसानीचे पंचनामे, शासनाने घोषित केलेल्या मदतीचे वाटप, पीक विमा, पीक कर्ज वाटप, पीक हंगामाची तयारी जिल्ह्यातील योजना व इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच बैठकीत शाळांचा आढावा घेतला, लसीकरण व नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा आढावा घेतला .
याप्रसंगी तहसीलदार प्रमोद हिले, पोलीस निरीक्षक भूषण मथुरे, ग्रामिण पोलिस निरीक्षक भौरी, नगरपरिषद मुख्याधिकारी सौ.संगिता नादुर्डीकर, सा.बा. विभाग उपअभियंता सागर चौधरी, उमेश पाटील, कृषी अधिकारी कारभारी नवले, महावितरण अधिकारी आर.एम.पाटील, इंगळे, जि.प.उपअभियंता अर्जुन घोडके, गटविकास अधिकारी देशमुख, नगराध्यक्ष बंडू पहिलवान, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.नंदकिशोर शिंदे, भाजपा नेते पप्पू सस्कर, वरिष्ठ नेते बाबा डमाळे पाटील, शहराध्यक्ष तरंग गुजराथी, नाना लहरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संतोष केंद्रे, गणेश गायकवाड, राजू परदेशी, गणेश शिंदे, दत्ता सानप, दिनेश परदेशी, युवराज पाटोळे, बडा शिंदे, चेतन धसे, संतोष काटे, कुंदन हजारे, गोरखनाथ खैरनार, छगन दिवटे, महेश पाटील, केदारनाथ वेलांजकार, गणेश गायकवाड, प्रणव दीक्षित, मयूर मेघराज यांचेसह आदी पदाधिकारी, शासकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button