Pune

एस. बी. पाटील अभियांत्रिकी मधील  गुणवंत विद्यार्थ्यांची  IT  कंपन्यांमध्ये   निवड 

एस. बी. पाटील अभियांत्रिकी मधील गुणवंत विद्यार्थ्यांची IT कंपन्यांमध्ये निवड

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान संचलित एस. बी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची IT कंपन्यांमध्ये निवड झाली. त्यापैकी ‘Cognizant’ कंपनी मध्ये मयुर खटावकर मेकॅनिकल विभाग (3.6 LPA ),रेश्मा घुले ,निखिल काकडे कम्प्युटर विभाग (3.6 LPA ), ‘विप्रो’ कंपनी मध्ये सोनाली
घोळवे ,सिव्हिल विभाग (8.5 LPA ),दत्तात्रय मगर ,चैतन्य मगर ,साक्षी गांधी,अंजली क्षीरसागर सर्व कॉम्पुटर विभाग (4.2 LPA) आणि ‘TCS’ या नामांकित कंपनी मध्ये अनिकेत कणसे, अविनाश पाटील, दत्तात्रय मगर चैत्यन्य मगर ,साक्षी गांधी ,प्रगती खोडावे, प्राजक्ता देवकर , संजना गांधी , पाटील धवलसिंग ,योगेश कटमवार सर्व कम्प्युटर विभाग (4.2 LPA ), मयुर खटावकर, अक्षय शिंदे,प्रसाद निंबाळकर मेकॅनिकल विभाग (3.36 LPA ) ,किर्ती निंबाळकर इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन विभाग (4.2 LPA ) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे प्राचार्य डॉ. एस. टी. शिरकांडे यांनी अभिनंदन केले.
प्राचार्य डॉ. एस. टी. शिरकांडे म्हणाले, महाविद्यालयाचा नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार असल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणा बरोबरच विविध विषयांच्या ट्रेनिंग्ज, तसेच प्लेसमेंटमध्ये महाविद्यालय आघाडीवर आहे. विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग’चा विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी फायदा होत असून, महाविद्यालयाच्या ‘इंटर्प्रिनरशिप डेव्हलपमेंट सेल’ अंतर्गतही विद्यार्थ्यांना करिअरच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर (टीपीओ) प्रा. एस. पी. कांबळे म्हणाले, की विध्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी कॉलेजमध्ये सॉफ्ट स्किल डेव्हलोपमेंट , फॉरेन लँग्वेज कोर्सेस ,अँप्टीट्युड टेस्ट,मॉक इंटरव्हिव असे विविध उपक्रम नेहमी राबिवले जातात.
या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन पाटील साहेब, सचिव मा. सौ. भाग्यश्री पाटील ,उपाध्यक्षा मा. अंकिता पाटील आणि विश्वस्थ मा. राजवर्धन पाटील यांनी निवड झालेल्या विध्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button