Bollywood

?️ Breaking…बहूचर्चित “झुंड”..लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..! काय आहे खास या चित्रपटात..!

?️ Breaking…बहुचर्चित झुंड..लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..! काय आहे खास या चित्रपटात..!

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मु्ख्य भूमिका आणि नागराज मंजुळे याचे दिग्दर्शन या भन्नाट समीकरणामुळे चाहते आगामी ‘झुंड’ चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आणि नागराज मंजुळे याचे दिग्दर्शन या भन्नाट समीकरणामुळे चाहते आगामी झुंड चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी गेल्या वर्षीच या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट नागपूरचे निवृत्त क्रीडाशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. बारसे हे झोपडपट्ट्यांमधील मुलांना फूटबॉल शिकवतात. या चित्रपटात या शिक्षकाची भूमिका अमिताभ बच्चन साकारणार आहेत.
अमिताभ बच्चन यांनी तारखा उपलब्ध नसल्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. नंतर कॉपीराईटसंबंधित काही अडचणींचादेखील सामना ‘झुंड’ला करावा लागला. दरम्यान, पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आवारात उभारलेला सेटही काढून टाकण्यात आला होता. अशा असंख्य अडचणींनंतर ‘झुंड’चे चित्रीकरण नागपुरात यशस्वीरित्या पार पडले.
सैराट सिनेमामुळे घराघरात पोहोचलेला मराठमोळा दिग्दर्शक नागराज मंजुळे झुंड या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. नागराजचा बॉलिवूडमधील हा पहिला सिनेमा आहे.

सत्य घटनेवर आधारित सिनेमा

बिग बी अमिताभ बच्चन हे एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. झोपडीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा शिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या सिनेमाची कथा आहे. सत्यकथेवर आधारित हा सिनेमा आहे. नागराज मंजुळेने या सिनेमाची स्क्रीप्ट लिहिण्यासाठी सुमारे दोन वर्ष वेळ घेतला. बिग बी अमिताभ बच्चन यांना नजरेसमोर ठेवूनच नागराजने ही स्क्रीप्ट लिहिली.

ज्या विजय बारसेंवर झुंड हा सिनेमा आधारित आहे, त्यांनी अनेक मुलांचं आयुष्य बदलून टाकलं. विजय बारसे एका कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक होते. निवृत्तीनंतर त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण दिलं.

सिनेमाचा वाद कोर्टात

दरम्यान, या सिनेमाचा वाद कोर्टात गेला होता. चित्रपटातील सहाय्यक व्यक्तिरेखेवरील कॉपीराईटमुळे ‘झुंड’ वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. नोव्हेंबर 2020 मध्ये या सिनेमा वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती. त्यावेळी कोर्टाने सिनेमा रिलीज करण्यास स्थगिती घातली होती. प्रदर्शनावरील स्थगिती उठवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला होता. मात्र आता या सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button