Aurangabad

संपत्तीच्या वादातून मुलाने केला पित्याचा खून; आरोपी अटकेत

संपत्तीच्या वादातून मुलाने केला पित्याचा खून; आरोपी अटकेत
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यातील मुर्शिदाबादवाडी येथे संपत्ती वाटपाच्या वादातून मुलाने पित्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना रात्री घडली असून, पोलिसांनी नऊ तासांत या प्रकरणाचा छडा लावून आरोपी मुलाला अटक केली आहे.
तालुक्यातील मुर्शिदाबादवाडी येथील परसराम अप्पा पवार हे पत्नीसह राहतात. त्यांना दोन मुले आहेत. दोघांचीही लग्न झाले असून ते वेगळे राहतात. परसराम यांच्याकडे दोन एकर शेती, 30 शेळ्या, दोन बैल आणि एक दुचाकी अशी संपती होती. संपत्तीचे वाटप करताना त्यांनी शेतीसह शेळ्यांचे वाटप केले.
दरम्यान यानंतर दोन्ही बैल लहान मुलगा योगेशला दिले, तर दुचाकी मोठा मुलगा रोहिदासला दिली होती. यावर मला दुचाकी नको, तर दोन्ही बैल हवे, म्हणून रोहिदास हा परसराम यांच्यासोबत नेहमी वाद घालत होता. हाच वाद टोकाला जाऊन त्याने बापाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी मुलास अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button