Yawatmal

कंटनेरची मोटर सायकलला जबर धडक दोन ठार एक जखमी

कंटनेरची मोटर सायकलला जबर धडक
दोन ठार एक जखमी

विशाल मासुरकर यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातुन एक मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे
कुंभा -मारेगाव रोडवरील गोंडबुरांडा जवळ कंटेनरची जबर धडक बसल्याने मोटार सायकल वरील दोघे जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना ता. १४ जानेवारी ला ४वाजे दरम्यान घडली.

मारेगाव कुंभा मार्गावरील गोंडबुरांडा नजिक मारेगाव कडून जाणाऱ्या कंटेनर क्र.टी एस २६ टी ३१५१ ने कुंभा वरून येणाऱ्या एम एच २९ बी के ५६०५ या दुचाकीला जबर धडक दिली.या धडकेत भीमराव टेकाम वय २५ , प्रदीप टेकाम वय २६ हे दोघे जागीच ठार झाले ,तर दत्ता मेश्राम वय २५ हा गंभीर जखमी झाला.हे तिघेही झोटींगधरा ता. पांढरकवडा येथील रहिवासी आहेत.

धडक एवढी भीषण होती की मृतक भीमराव टेकाम , प्रदीप टेकाम दोघांच्याही अंगावरून गाडीची चाके गेल्याने एकाच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला तर दुसऱ्याचे शरीर पूर्णतः विद्रुप झाले होते.

कंटेनर ने धडक दिल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु मारेगाव पोलिसांनी कंटेनर चा पाठलाग करून खैरी गावाजवळ कंटेनर सह चालकाला ताब्यात घेतले.
मोटारसायकल वरील तिघेही नातलग असून चुलत भाऊ असल्याची माहिती मिळाली ते कुंभा येथिल काम आटोपून गावाकडे निघाले होते.
मारेगाव पोलिसांना घटनेचे वृत्त कळताच घटनास्थळी धाव घेतली व जखमी ला उपचारासाठी दवाखान्यात हलविले पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदीश मडलवार करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button