Parola

? Big Breaking..महामार्गालगत अनोळखी 60 वर्षीय पुरुष इसमाचा मृत्यु,ओळख पटविण्याचे आवाहन

महामार्गालगत अनोळखी 60 वर्षीय पुरुष इसमाचा मृत्यु,ओळख पटविण्याचे आवाहन

रजनीकांत पाटील

पारोळा :- येथील राष्ट्रीय महामार्ग क्र 6 जवळील विचखेडा ता,पारोळा येथील रस्त्यालगत एका 60 वर्षीय अनोळखी पुरुष इसम मृत अवस्थेत पडल्याची घटना दि 12 रोजी सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात आली.

याबाबत विचखेडे ता,पारोळा येथील महामार्ग लगत सकाळी 6 वाजेपुर्वी वेळ नक्की नाही.च्या सुमारास एका 60 वर्षीय पुरुष इसम मृत अवस्थेत रोडावर दिसल्याने गावातील ग्रामस्थांनी घटनेस्थळी धाव घेतली.व सदर माहीती पारोळा पोलिसात कळविली असता मयत व्यक्तीच्या प्रेतास कुटीर रुग्णालय येथे आणुन ठेवले असुन अनोळखी व्यक्तीचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांसमोर आले आहे.याबाबत पारोळा पोलिसात पोलिस पाटील ज्ञानेश्वर झेलाटे यांनी दिलेल्या खबरी वरुन अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.तपास पीएसआय गणेश मु-हे करित आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button