Amalner

धनदाई महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त शिवगौरव पुरस्कारांचे वितरण व गुणगौरव सोहळा संपन्न.

धनदाई महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त शिवगौरव पुरस्कारांचे वितरण व गुणगौरव सोहळा संपन्न.

नूर खान

अमळनेर : येथीवल धनदाई महाविद्यालयात शिवजयंती निमित्त महाविद्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या “शिवगौरव पुरस्कारांचे” वितरण आज रोजी करण्यात आले.यातील शिवगौरव सन्मान धुळे येथील सुयोग हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध डॉ. दिलीप रतन पाटील यांना तर शिवगौरव पुरस्कार विद्यापीठाचे माजी विद्यार्थी कल्याण व राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक तथा पालेशा महाविद्यालयाचे प्रा. विलास चव्हाण यांना प्रदान करण्यात आला.

धनदाई महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त शिवगौरव पुरस्कारांचे वितरण व गुणगौरव सोहळा संपन्न.

या प्रसंगी पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल अमळनेर पोलीस स्टेशन मधील गुप्तवार्ता विभागातील डॉ. शरद पाटील यांचा व विविध वर्गात नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे चेअरमन आबासाहेब व.ता. पाटील हे तर प्रमुख अतिथी म्हणून धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डी. डी. पाटील, संचालक के. डी. पाटील, सयाजीराव कापडणेकर, शैलेंद्र पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रमोद पवार हे उपस्थित होते.

धनदाई महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त शिवगौरव पुरस्कारांचे वितरण व गुणगौरव सोहळा संपन्न.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन व वंदन करून करण्यात आली. आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांनी संस्थेची वाटचाल व शिवगौरव पुरस्कार यामागची भूमिका स्पष्ट केली. तर संस्थेचे अध्यक्ष प्रा. डी डी. पाटील यांनी शिवजयंतीनिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. एम बी बी एस चे शिक्षण पूर्ण करताना सात सुवर्णपदके मिळवणारे त्यानंतर एम.ए. इतिहास, एम. ए . राज्यशास्त्र व एल.एल.बी. असे शिक्षण पूर्ण करून सर्वांना प्रेरणा देणारे, सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे डॉ. दिलीप पाटील व विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास व्हावा त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित व्हावे म्हणून प्रयत्न करणारे डॉ विलास चव्हाण यांची शिवगौरव पुरस्कारासाठी निवड केल्याचे प्रा लिलाधर पाटील यांनी सांगितले.

धनदाई महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त शिवगौरव पुरस्कारांचे वितरण व गुणगौरव सोहळा संपन्न.पुरस्काराला उत्तर देताना प्रा विलास चव्हाण यांनी महाविद्यालयाचे वातावरण पाहून आपण भारावलो असून ध्येयनिश्चिती, दृढविश्वास, चिकाटी व प्रयत्नातील सातत्य यातून यशाचा मार्ग निघतो ही प्रेरणा आपण शिवचरित्रातून घ्यावी असे आव्हान त्यांनी याप्रसंगी केले. यानंतर डॉ दिलीप पाटील यांनी आपल्या खुमासदार शैलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला शिवाजी महाराजांनी आपले चरित्र आणि चारित्र्य संस्कारांच्या माध्यमातून घडविल्या मुळे शिवाजी महाराजांचे शत्रूसुद्धा त्यांच्या सद्गुणांचा समोर नतमस्तक होत असत. आजच्या गतिमान परिस्थितीत झपाट्याने बदल होत असून जिजाऊंनी शिवाजी महाराजांचे प्रबोधन केले त्या पद्धतीचे प्रबोधन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. दिलीप पाटील यांनी केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात व. ता. पाटील यांनी शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांमुळेच भारत हा महान देश असून आपण विरोध करण्यापेक्षा सकस स्पर्धा केली पाहिजे असे आव्हान करून न थांबता पुढे जाण्याची प्रेरणा महाराजांकडून घ्यावी असे आवाहन केले.
याप्रसंगी महाविद्यालयात विविध वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम आल्याबद्दल तसेच एन.एस.एस., क्रीडा, ग्रंथालय, संस्कृतिक आदी विविध कार्यक्रमात यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लिलाधर पाटील यांनी तर आभार प्रदर्शन के.डी. पाटील यांनी केले.याप्रसंगी शांतीनिकेतन प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका निवेदिता कापडणेकर त्यांचे सर्व शिक्षक, जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आय.टी.आय. महाविद्यालय तसेच धनदाई माता कला व विज्ञान महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button