? Big Breaking..इंडस कंपनी चे मोबाईल टॉवर सील..
इंडस कंपनीचे मोबाईल टॉवर सील..तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाची मोठी कारवाई..
अमळनेर येथील इंडस कंपनी चे टॉवर सील करण्यात आले.यात चिकाटे गल्ली,मनोकामना साडी सेंटर जवळ,मंगरूळ या तीन ठिकाणचे 5 टॉवर आज सील करण्यात आले. इंडस कम्पनी कडे महसूल विभागाची 12 लाख 50 हजार एव्हढि थकबाकी होती.वारंवार सूचना देऊन ही संबंधित कंपनीने थक बाकी न भरल्या मुळे आज सील करण्याची कार्यवाही तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या आदेशाने करण्यात आली.
या कम्पनीचे एकूण 30 टॉवर असून अमळनेर शहरात 7 आणि 23 ग्रामीण भागात असे विभागलेले आहेत.
या पथकात डी एस तारे मंडळ अधिकारी अमळनेर , तलाठी प्रथमेश पिंगळे, हर्षवर्धन मोरे, जितेंद्र पाटील, राधिका गरुड, संगीता भोसले इ चा सहभाग होता.






