Amalner

Amalner: भाजयुमो च्या मोफत ई-श्रम कार्ड नोंदणीस कामगारांचा उदंड प्रतिसाद…

भाजयुमो च्या मोफत ई-श्रम कार्ड नोंदणीस कामगारांचा उदंड प्रतिसाद

असंघटित क्षेत्रातील 1480 कामगार बांधवानी केली नोंदणी

अमळनेर-भाजपाचे दिवंगत नेते स्व.उदय वाघ यांच्या जयंती निमित्ताने काल दि.22 रोजी आयोजित केलेल्या मोफत ई-श्रम कार्ड नोंदणीस असंघटित क्षेत्रातील कामगार बांधवांचा उदंड असा प्रतिसाद लाभला,तब्बल 1480 कामगार बांधवांची नोंदणी एकाच दिवशी झाली.
विशेष म्हणजे काही कामगार बांधव केंद्र शासनाच्या या योजनेपासून अनभिज्ञ असताना माजी आ.स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली व भाजयुमो च्या प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुका व शहर भाजयुमोने भाजप नेते स्व.उदय वाघ यांच्या जयंतीनिमित्त हे अभियान आयोजित केल्याने कामगारांनी विशेष आभार व्यक्त केले,नोंदणीसाठी काल सकाळपासूनच स्व उदय वाघांच्या स्मारकस्थळी रांगा लागल्या होत्या,सायंकाळपर्यंत 1480 असंघटित कामगारांची नोंदणी करण्यात आली. सकाळी 11 वाजता धुळे रोडवरील बाजार समिती समोरील स्व.उदय वाघ यांच्या स्मारकस्थळी स्व उदय वाघ यांच्या प्रतिमेस जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील,माजी सभापती श्याम अहिरे,प्रफुल्ल पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी भाजयुमो प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे,भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे आणि भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व युवा मोर्चा कार्यकर्ते उपस्थित होते.सदर नोंदणीसाठी संबधित कामगार बंधूनी आधारकार्ड, बँक पासबुक व मोबाईल क्रमांक सोबत आणून नोंदणी करून घेतली.अभियानासाठी सर्व भाजप व भाजयुमो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

प्रतिसाद पाहता कार्यालयात नोंदणी सुरूच राहणार

ई श्रम कार्ड नोंदणी अभियानास कामगार बंधूनी उस्फूर्त असा प्रतिसाद दिला मात्र काही काही बांधव अडचणीमुळे या दिवशी नोंदणीसाठी पोहचू शकले नसल्याने त्यांचीही मोफत नोंदणी माजी आमदार स्मिताताई वाघ यांचे संपर्क कार्यालय,चिकाटे गल्ली, न्यू प्लॉट,अमळनेर येथे दररोज होणार असून तरी कामगार बांधवानी वरील वेळेत कार्यालयात संपर्क साधून अवश्य नोंदणी करून घ्यावी असे आवाहन भैरवी वाघ पलांडे यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button