Kolhapur

सुरेखा औताडे यांची  वाळवा तालुका शिक्षक भारतीच्या सरचिटणीस(महिला आघाडी) पदी  निवड

सुरेखा औताडे यांची वाळवा तालुका शिक्षक भारतीच्या सरचिटणीस(महिला आघाडी) पदी निवड

सुभाष भोसले-कोल्हापूर
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याच्या सरचिटणीस पदी नेमणूक करण्यात आली.त्यांना निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष महेश शरणाथे यांनी दिले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस कृष्णा पोळ,कार्याध्यक्ष सुरेश खारकांडे,कोषाध्यक्ष बालम मुल्ला,जिल्हा नेते दीपक कांबळे,अन्सारअली जमादार,तालुका सरचिटणीस सुधाकर वसगडे,तालुका कार्याध्यक्ष बजरंग विरभद्रे,सौ देशमुख ,श्री औताडे,शिक्षक बंधू व महिला भगिनी व तालुका अध्यक्ष चंद्रशेखर क्षीरसागर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सौ देशमुख म्हणाल्या आम्ही महिला अत्यंत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षक भारतीसाठी काम करू.नूतन सरचिटणीस सुरेखा औताडे म्हणाल्या की हे पद म्हणजे नवी जबाबदारी असून शिक्षक भारती परिवाराची सदस्य झाल्याचा खूप अभिमान व आनंद वाटत आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेश शरणाथे यांचाही सत्कार करणेत आला.यावेळी बोलताना महेश शरणाथे म्हणाले की शिक्षक भारती हे कुटुंब असलेने प्रत्येक शिक्षकाच्या पाठीमागे शिक्षक भारती ठामपणे आहे.

अध्यक्ष चंद्रशेखर क्षीरसागर यांनी सुरेखा औताडे नक्कीच शिक्षकांचे प्रश्न सोडवनेस पुढाकार घेतील व शिक्षक भारतीचे नाव शिक्षकांच्या मनामनात पोहोचवतील यात शंका नाही.जिल्हा सरचिटणीस कृष्णा पोळ सर यांनीही मनोगत व्यक्त केले.आभार बालम मुल्ला यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button