Jalgaon

?️ कोरोना ब्रेकिंग…जिल्ह्यात आज ५२ नवीन कोरोना बाधीत; रूग्ण संख्या सोळाशेच्या उंबरठ्यावर

जिल्ह्यात आज ५२ नवीन कोरोना बाधीत; रूग्ण संख्या सोळाशेच्या उंबरठ्यावर

रजनीकांत पाटील

जळगाव प्रतिनिधी । आज संध्याकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात एकूण ५२ कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून यामुळे आता रूग्णांचा आकडा सोळाशेच्या उंबरठ्यावर आल्याचे दिसून आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात सर्वाधीक २० रूग्ण हे भुसावळचे आढळून आले असून याच्या खालोखाल १७ रूग्ण हे भुसावळचे आहेत. उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण व जामनेर प्रत्येकी ३; पारोळा, एरंडोल व चोपडा प्रत्येकी २ तर अमळनेर, रावेर आणि यावल प्रत्येकी १ रूग्णांचा समावेश आहे. आजच्या ५२ रूग्णांमुळे जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या तब्बल १५७८ इतकी झाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button