Chandrapur

आदिवासी महिलेवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करा – अर्जुन युवानेते

आदिवासी महिलेवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करा – अर्जुन युवानेते

अमरावती / प्रतिनिधी – लक्ष्मण परधाम

चंद्रपूर येथील आदिवासी महिलेला विवस्त्र करून धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याची मागणी बिरसा क्रांती दल अमरावती वतीने पोलिस महासंचालक अमरावती यांना निवेदन देऊन केली.
निवेदनात म्हटले आहे की श्रीमती तृप्ती मनोज कुळमेथे राहणार चंद्रपूर ही आदिवासी महिला येथील एका परिचित व्यक्तीकडे दिनांक 5 जानेवारी 2020 रोजी लग्न समारंभ कार्यक्रमासाठी जलनगर वार्ड कंजर मोहल्ला येथे गेले असता दुसऱ्या महिलेच्या घरी बसून असताना सौ सारिका कंजर, नरेश कंजर, अक्षय कंजर, अमन जाट या चार जणांनी तिला विवस्त्र करून तिच्यावर प्राणघातक हल्ला केला तिच्या हातावर मांडीवर पाठीवर धारदार चाकूने गंभीर जखमी केले.

या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला परंतु त्यांना अजून पर्यंत अटक करण्यात आलेली नाही आरोपी हे दारू व्यवसाय करीत असून गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे.
आरोपी फरार असून आदिवासी महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत या कुटुंबातील सदस्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे वास्तविक घटनास्थळ हे पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर आहे पण तरीही आरोपी नाटक करण्यात आलेले नाही आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी ही विनंती अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल.
त्यावेळी बिरसा क्रांती दल अमरावती जिल्हाध्यक्ष अर्जुन युवानेते, जिल्हा महासचिव लक्ष्मण परधाम, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत आत्राम, बिकेडी स्टुडंट फोरमचे जिल्हाध्यक्ष प्रविण सराटे, मारोती वरखडे, निलेश कुमरे, संजय सोळंके उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button