दुर्गम धनगरवाड्यांवर आरोग्यदूत नेमा – संजय वाघमोडे
दत्ता पारेकर पुणे
पुणे : भारताला स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे झाली तरीही अजूनही रस्त्या अभावी व आरोग्य सुविधांच्या अभावी कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम धनगर वाड्यावरील लोकांचा हकनाक बळी जात असून या घटना रोखण्यासाठी अशा दुर्गम भागात आरोग्य दूत नेमून विकासापासून वंचित असणाऱ्या घटकांना न्याय द्यावा असे निवेदन यशवंत सेनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी
ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील कोल्हापूर चे खासदार संजय मंडलिक हातकणंगले चे खासदार धैर्यशील माने व कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना दिले असून सदर गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित मंत्री खासदार व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या समस्येवर तात्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन संजय वाघमोडे यांना दिले आहे.
म्हासुर्ली , मानेवाडीच्या जवळच दोन-तीन किलोमीटरच्या अंतरावर धनगरवाडे असून, रस्त्याचा कोणताही मार्ग नाही. त्यामुळे येथील नागरिकांना पाय वाटेनेच प्रवास करावा लागतो.
म्हासुर्लीपैकी मधला धनगरवाडा येथील अकरा वर्षाच्या मुलाचा तीन महिन्यांपूर्वी सर्पदंशाने वेळेत उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला होता.
वरील घटना ताजी असतानाच गुरुवार दि.१९ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास सौ.भागुबाई राजाराम घुरके.(वय 26) या गरोदर महिलेच्या पोटात रात्री २ वाजता पोटात दुखु लागले रस्ता नसल्याने डोलीत घालुन दवाखान्यात घेऊन जायची तयारी करत असतानाच सदर महिलेची डिलिव्हरी घरीच झाली व बाळ आणि बाळंतीन यांचा लगेचच मृत्यू झाला. तिला रस्ता नसल्याने वेळेत दवाखान्यात दाखल करता आले नाही. त्यामुळे तीला वेळेत उपचार न मिळाल्याने तिला आणि तिच्या बाळाला जग पाहण्याआधीच जीव गमवावा लागला आहे.
अशा घटना वारंवार घडत आहेत. केवळ रस्ता नसल्याने बळी जात आहेत.कृपया दुर्गम भागातील लोकांच्या पर्यत आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी दुर्गम वस्ती किंवा वाड्यावर कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या एखाद्या महिलेस किंवा पुरुष यापैकी जादा शिक्षण घेतलेल्यांची आरोग्य प्रशिक्षण देऊन त्यांची नेमणूक आरोग्यदुत म्हणून करून त्यांच्याकडे पुरेसा औषध साठा उपलब्ध करून दिल्यास उपचार वेळेत मिळुन एखाद्याचा प्राण वाचु शकतो. अशी सुचना निवेदना देण्यात आले आहे यावर लवकरात लवकर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे मंत्री महोदय व खासदार साहेब मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सांगितले
यावेळी संदिप कारंडे,धनगर समाज आरक्षण गोलमेज परिषद निमंत्रक अमोल मेटकर, जिल्हा संघटक यशवत सेना, अनिल बनकर, यशवंत सेना करवीर तालुका अध्यक्ष, संदिफ हजारे यशवंत सेना कागल तालुका अध्यक्ष, सुनील शेळके, राधानगरी तालुका अध्यक्ष, संदिप झोरे यशवंत सेना, प्रसिद्धीप्रमुख राधानगरी, युवक नेते अमोल गावडे कुंभोज , श्री.कोळी, अजित फोंडे भुदरगड यशवंत प्रा.घुरके शाहूवाडी, सेना,दत्ता ठोंबरे, दिपक ठोंबरे अमोल मेटकर अरुण.फोंडे व यशवंत सैनिक उपस्थित होते.






