Amalner

अमळनेर तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन.

अमळनेर तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन.

अमळनेर तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन.

 अमळनेर महसूल कर्मचारी हे आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरील  ५ सप्टेंबरच्या संपात होणार सहभागी.
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने दिनांक ५ सप्टेंबर २०१९ पासून पुकारलेल्या संपात सहभागी होत असलेबाबत
मा.उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे मँडम तसेच तहसिलदार यांच्या अनुपस्थितीत नायब तहसिलदार श्री.महाडीक रावसाहेब यांना देण्यात आले. यापूर्वी संघटनेच्या बैठकांमध्ये शासनाने संघटनेच्या मागण्या हया तत्वत: मान्य केलेल्या आहेत परंतू त्यावर शासन निर्णय काढून अंमलबजावणी केलेली नसल्याने महसूल कर्मचारी यांना नाईलाजास्तव बेमुदत संपावर जावे
लागत आहे. दिनांक ५ सप्टेंबर २०१९ रोजी जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व १५ तालुक्यातील महसूल कर्मचारी संघटना जमा होणार असून आंदोलनाची सुरुवात करणार
आहेत. निवेदन द्यायच्या वेळेस महसूल कर्मचारी जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री.अतुल बागुल, उपविभागीय अध्यक्ष श्री.दिनेश सोनवणे तालुका अध्यक्ष श्री.भूषण पाटील , प्रशांत धमके,
अशोक ठाकरे, शिवलाल गवळी, संदिप पाटील, गंगाधर सोनवणे, कपील चौधरी, किरण मोरे, संजय ब्राम्हणे, महिला प्रतिनिधी श्रीमती प्रतिभा अहिरराव, श्रीमती विद्या पाटील, श्रीमती
भारती शेवाळे , श्रीमती सुषमा पाटील , श्रीमती प्रियंका पाटील इ. सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button