Aurangabad

मराठा समाजाला आरक्षण कसल्याही पद्धतीने मिळालेच पाहीजे नाहीतर उद्रेक अटळ :अजय पाटील मोटे

मराठा समाजाला आरक्षण कसल्याही पद्धतीने मिळालेच पाहीजे नाहीतर उद्रेक अटळ : अजय पाटील मोटे

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : मराठा आरक्षणाचा लढा हा आजचा नाही गेल्या अनेक वर्षापासुन मराठ्यांचे क्रांतीसुर्य आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नेत्रत्वाखाली सुरुवात झाली आहे. आज काही स्वयंघोषीत मराठा नेते समाजाला असे भासवत आहेत की हा लढा आम्हीच उभा केला आहे. या मराठा आरक्षणाच्या मागणीच्या आडुन प्रत्येक जन स्वताचा राजकिय स्वार्थ साधण्याच्या मागे लागला आहे. कोणी भाजपकडुन खासदारकी तर कोणी आमदारकी तर कोणी महामंडळ तर कोणी सारथी संस्था कशी मिळेल याकडे लक्ष लाऊन मराठा समाजाचा वापर करुन घेत आहेत.

परंतु आजपर्यंत छावा संघटनेने फक्त आणी फक्त समाजाचाच विचार केला. समाजाला न्याय कसा मिळेल याचाच विचार डोळ्यासमोर ठेऊन आंदोलने केली आहेत. आज जे राज्यात मराठा मुक आंदोलने सुरु आहेत ते फक्त समाजाची दिशाभुल करुण समाजाला शांत करण्याचे काम व राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर ठेऊनच आंदोलने सुरु आहेत. यापुढे छावा संघटना खपवुन घेनार नाही. या अशा समाजासोबत गद्दारी करुन स्वताचे राजकीय पोट भरणाऱ्याना छावा चाबकाने भर रस्त्यात फोडनार आहे. कारण स्व आण्णासाहेब जावळे पाटलांनी समाजासाठी आपला प्राण पणाला लावला आहे त्यामुळे समाजासोबत जर कोणी बैमानी करत असेल तर छावा यांचा आपल्या स्टाईलने बंदोबस्त करेल.

मराठा समाजाची मुख्य मागणी ही आरक्षणाची आहे त्यानंतर बाकीच्या मागण्या आहे. म्हणुन आमची भुमिका अशी आहे की आगोदर आरक्षण द्या मग बाकीचे बघु कारण आज समाजातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान हे खुप मोठ्या प्रमानात झाले आहे. त्यामुळे सरकारने आरक्षणाचा निकाल लवकरात लवकर लावावा अन्यथा उद्रेक अटळ आहे. आणी यापुढील महाराष्ट्रातील मराठा समाजाचे आंदोलने हे मुक नसुन ठोक व निर्णायक असतील याची राज्य व केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी. या बैठकीत वैजापुर तालुका अध्यक्ष किशोर पाटील मगर शहर, अध्यक्ष अमोल होंड ,संतोष वडगुले व असंख्य छावे उपस्थीत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button