Faijpur

पिपंरुड येथे पिकारील कीडरोग सर्व्हेक्षण व सल्ला प्रकल्प 2019-2020 अंतर्गत रबीहंगामात हरभरा पिकाची शेती शाळा तसेच किट वाटप

पिपंरुड येथे पिकारील कीडरोग सर्व्हेक्षण व सल्ला प्रकल्प 2019-2020 अंतर्गत रबीहंगामात हरभरा पिकाची शेती शाळा तसेच किट वाटप

सलीम पिंजारी

पिकवाढी साठी शेतकऱ्यांनी शेतीशाळे मध्ये सहभाग नोंदवावा. पीक वाढीसाठी बियाण्यास प्रक्रिया करावी ज्यामुळे 15 ते 20% उत्पादनात वाढ़ होते व पीक सशक्त व कीड विरहित होते.त्यामुळे जमिनीचा कस कायम टिकतो स्पर्धेच्या युगामध्ये ह्या गोष्टी करणे खूप गरजेचे आहे असे प्रतिपादन अरुण फेगडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.अशा कीटक नाशकाचा वापर करून जसे कि निंबोळी अर्क व लमित द्रावणाचा उपयोग करावा.सर्व उपस्थित शेतकरी बांधवाना किट वाटप करण्यात आले.हरीश चौधरी यांच्या शेतात हरभऱ्याच्या शेतात शेतीशाळा घेण्यात आली.

त्या वेळेस एच.एस. कोल्हे मंडळ कृषी अधिकारी फैजपूर, नंदकिशोर चौधरी सरपंच, हरीश चौधरी पोलीस पाटील, राहुल कोल्हे, एम. ए. पाटील कृषी सहायक, आर.जी बावस्कर कृषी सहायक, नारायण पाटील, अशोक चौधरी,जगन्नाथ कोल्हे,अशोक कोळी,दिलीप चौधरी, मोतीराम कोल्हे, रामकृष्ण चौधरी, ललित चौधरी,युवराज पाटील, पुडलिक सुरवाडे, योगेश चौधरी, अनिल चौधरी, हेमराज चौधरी,वाल्मिक तायडे, नामदेव तायडे, भूषण तायडे, राजेंद्र तायडे तसेच मोठया संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button