Kolhapur

गारगोटी येथे लेखक सुनील देसाई यांच्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

गारगोटी येथे लेखक सुनील देसाई यांच्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

कोल्हापूर (तुकाराम पाटील):

श्री शाहू वाचनालय गारगोटी, येथे लेखक सुनील रंगराव देसाई यांच्या सावज व संघर्ष या ग्रंथांचा प्रकाशन सोहळा मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ.श्रीपाल सबनीस यांचे शुभ हस्ते संपन्न झाला. डाॅ.जालंधर पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मान. बजरंग देसाई व दिशोत्तमाचे प्रकाशक रवींद्र पाटील प्रमुख उपस्थित होते.
यावेळी डाॅ.सबनीस म्हणाले की,नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवाजी सावंत, रणजित देसाई यांचा वारसा चालवणारे दमदार लेखक म्हणून सुनील देसाई यांचे नाव घेता येईल. त्यांची लेखन शैली अगदी ओघवती असून मानवी स्वभाचे मनोविश्लेषण करून व्यक्तिरेखा उभ्या करण्याची अफाट क्षमता त्यांच्यात आहे. सावज या कथासंग्रहातील आठ कथामधून त्यांनी ग्रामीण जीवनावर खूपच चांगली मांडणी केली. प्रा.जांलदर पाटील म्हणाले की,दुर्दम्य आजारावर मात करून सुनील देसाई यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या आधारे केलेले लेखन नव्या पिढीला प्रोत्साहन देणारे आहे.
यावेळी युवक नेते राहूल देसाई, विश्वस्त वसंतबापू देसाई, डॉ. मोमीन साहेब, एच.आर.पाटील सर, एम.डी.रावण, जठार सर, डाॅ.मनमोहन राजे,फिल्म अॅक्टर अमोल देसाई,जी. व्ही.कोरे,प्रा.सोळसे,एन.डी.पाटील, नंदकुमार सांडुगडे,एन.एच.पाटील, ग्रंथपाल प्रवीण गुरव,सचिन भोसले,व्ही.एस.देसाई, नारायण राणे, नारायण देसाई, रवींद्र गुरव,दत्ता मोरसे,राजन कोनवडेकर ,प्रा. शे ळके,पी.एल.कांबळे, सौ.सबनीस, सौ.ऋतुजा देसाई आणि इतर साहित्यप्रेमी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.पाहुण्यांचा परिचय एस.के.पाटील यांनी करून दिला,सूत्रसंचालन टी.बी.पाटील यांनी केले आभार आर.डी.देसाई यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाहू वाचनालयाच्या सेवक वर्गाने सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button