जीवनात आई व गुरु हेच आपले मार्गदर्शक- शिक्षक नेते दादासाहेब लाड बाळ डेळेकर व जे .डी.पाटील यांचा सत्कार संपन्न
सुभाष भोसले कोल्हापूर
कोल्हापूर : जीवनाला आकार देणारे शिक्षक, आई-वडील हेच आपले खरे मार्गदर्शक असतात ,त्यांचा आपण आदर, सन्मान राखला पाहिजे असे प्रतिपादन शिक्षक नेते श्री दादासाहेब लाड यांनी केले ते श्री शाहू हायस्कूल,ज्युनियर कॉलेज कागल येथे आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. शिक्षण प्रसारक मंडळाच्या कौन्सिल सदस्य पदी निवड झाल्याबद्दल बाळ डेळेकर यांचा तर महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य जे .डी.पाटील यांचा सत्कार शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या हस्ते करण्यात आला.माझ्या वाटचालीत शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी जयकुमार देसाईसो, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, युवा नेते व पेट्रन सदस्य दौलतराव देसाईसो, प्रशासन अधिकारी मंजिरी मोरे -देसाईसो ,शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शिक्षक नेते दादासाहेब लाड यांचेही योगदान मोलाचे आहे असे प्रतिपादन शाहू हायस्कूलचे उपमुख्याध्यापक व कोजिमाशिचे नूतन चेअरमन बाळ डेळेकर यांनी केले.माझा सन्मान हा माझ्या प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान आहे असे प्रतिपादन प्राचार्य जे.डी.पाटील यांनी केले यावेळी उपप्राचार्य बी .के. मडिवाळ,पर्यवेक्षिका सौ एस. ए .कुलकर्णी , श्री एस जी पाटील, श्री एस यु देशमुख ,एस आर पोतदार,के एच भोकरे, टी सी सुतार,सर्व शिक्षक- शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सूत्रसंचालन के. आय. जमादार तर आभार पर्यवेक्षिका सौ .एस. ए .कुलकर्णी यांनी मानले.






