टाकरखेडा येथे विहिरीत पडून विवाहितेसह दोन मुलांचा मृत्यू…
अमळनेर रजनीकांत पाटील
तालूक्यातील टाकरखेडा येथे विहिरीत पडून मातेसह दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना आज रोजी दुपारी ११.३० ते १२ चे सुमारास घडली आहे.
मयत सौ.भारती सचिन पाटील (वय ३२) व गजानन (वय १२) तसेच चि.स्वामी (वय ७) विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. विवाहितेचा पती सचिन देखील बाजूच्या शेतात काम करित होता. विहिरीत पडल्याच्या आवाजाने तो पळत आल्याने वाचवा वाचवा अशी आरोळी ठोकत करीत त्याने ग्रामस्थांना गोळा केले. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. सौ.भारतीचे माहेर भालेर (ता.नंदुरबार) येथील असल्याचे समजते.






