Akaluj

पुणे पदवीधर निवडणूकीत भाजपचा अहंकार मोडीत निघणार, मनेस अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे..

पुणे पदवीधर निवडणूकीत भाजपचा अहंकार मोडीत निघणार, मनेस अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे..

तात्या पिसे अकलूज

Akaluj : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार सौ रुपाली ताई पाटील ठोंबरे यांच्या प्रचार्थ अकलूजमध्ये मनसे अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.बैठकीला मनसे
जिल्हा सरचिटणीस आकाश होनमाने विनोद सावंत राहुल कुलकर्णी स्वपनिल कदम महाविर पारसे तेजस रोडे अजिम तांबोळी विकी केसकर उपस्थित होते.सदर बैठकीत मनसे अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे म्हणाले की,गेल्यावेळी या मतदारसंघाचे नेतृत्व आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले होते,मात्र त्यांनी पदवीधर मतदारांसाठी कोणतेही ठोस कार्य केले नसून त्यांची सत्ता असताना सुद्धा त्यांनी पदवीधर बेरोजगार यांच्यासाठी काम केले नसल्याने त्यांचा अहंकार मोडीत काढून त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आज मनसेच्या अधिकृत उमेदवार सौ रुपाली पाटील ठोंबरे यांना जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी नियोजन पर बैठक घेण्यात आली.तसेच अकलूजमध्ये अस्तित्वात असलेल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे एक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार यांनी भाजपच्या विरोधात बंडखोर केली असल्याने त्यांच्या भूलथापांना कोणी बळी पडणार नाहीत त्यामुळे मोहिते पाटील यांच्या संस्थेच्या पदवीधर मतदार दुविदा अवस्थेत आहेत,याचा फायदा मनसे उमेदवार यांना नक्कीच होईल अशी अपेक्षा आवारे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Back to top button